धक्कादायक ❗️वनमजुराचा वणव्यात होरपळून मृत्यू

Arjuni Mor: उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगल परिसरात वणवा लागल्याच्या घटना सहजपणे पाहायला मिळतात. मात्र, त्या वणव्याची आग विझवताना कर्तव्यावर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे.

सदर घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव रेंजमधील प्रतापगड बिट जंगलात घडली. देवबल्ली बोरकर (५७, रा. दहेगाव माईन, ता. लाखांदूर) असे मृत वनमजुराचे नाव आहे. वनमजुराच्या या दुर्दैवी मृत्यूबद्दल सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. वणव्याला नियंत्रित करण्यासाठी किंवा जंगलात आग लागूच नये म्हणून सुरु असलेले प्रयत्न कमी पडत असल्याचेच यावरून दिसून येते.

Share