सुवर्णकार समाजाचे दैवत नरहरी महाराजांची पुण्यतिथी थाटात साजरी

देवरी :सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या ७१० व्या पुण्यतिथीनिमित्त देवरी येथे पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर उदापुरे, उदघाटक संजू उईके नगराध्यक्ष देवरी , प्रमुख अतिथी सुरेश हर्षे , उपाध्यक्ष जिप गोंदिया, प्राचार्य डॉ. सुजित टेटे , सुखदेव कालबांधे, ताराचंद निनावे, रमेश येवले , केशव फाये, सुखदेव काळबांधे, दिलीप रोकडे, बालकृष्ण वडिकार, फाविंद्र हाडगे, प्रमोद रोकडे, कमला मस्के हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

शैक्षणिक, आध्यात्मिक संस्कार आणि सामाजिक एकात्मता समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असुन येणाऱ्या पिठीला याची जाणिव करुण देने आपले कर्तव्य आहे असे प्रा. डॉ. सुजित टेटे यांनी व्यक्त केले.याप्रसंगी जिप उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांचा सोनार समाज देवरूच्या वतीने सत्कार करण्यात आला. सामाजिक एकात्मता टिकवून ठेवून समाजाचा विकास कसा करता येणार यावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला परिसरातील सुवर्णकार समाजाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. सोनार समाजाच्या कार्यकारी मंडळाचे नवीन सचिव म्हणून दिनेश निनावे यांची सर्वमताने निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीलश टेटे यांनी केले , सूत्रसंचालन शुभांगी ढोमने यांनी केले असुन कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सुभाष दुबे, सुखदेव काळबांधे, प्रमोद रोकडे, गुलाब निनावे, दिलीप रोकडे आणि सुवर्ण सखी च्या ममता रोकडे, अल्का दुबे , सरिता कावले, वैशाली टेटे , शुभांगी निनावे आणि सर्व सदस्य यांनी केले असुन आभार प्रदर्शन ममता रोकडे यांनी मानले.

Share