
रोजगार हमीच्या कामावर मजुरी करणाऱ्या महिलांसोबत सविता पुराम यांची हळदीकुंक
देवरी/आमगाव विधानसभेतील 25 हजार महिला सोबत हळदी कुंकू करण्याचा प्रयत्न
देवरी :- गोंदिया जिल्ह्यातील देवरी/आमगाव विधानसभा येथे बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया आणि आमदार संजय पुराम यांच्या सौभाग्यवती सविता संजय पुराम यांनी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी रोजगार हमी योजना अंतर्गत महिला आणि पुरुष यांच्या करिता रोजगार उपलब्ध करून दिला. परिसरातील महिलांना एकत्रित करून सर्व महिलांचा हळदीकुंकू लावून सम्मान केला. आमदार संजय पुराम यांची पत्नी सविता पुराम यांनी सांगितले कि देवरी/आमगाव विधानसभांतील 25 हजार महिला सोबत हळदी कुंकू कार्यक्रम करणारच्या मानस. आता पर्यंत 12 हजार महिला सोबत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न केला असून रोजगार हमी कामाला सुरवात झाल्यामुळे रोजगार हमी ज्या ठिकाणी काम सुरु आहे तिथे जाऊन सर्व महिला सोबत हळदी कुंकू कार्यक्रम करत आहेत. या वेळी महिलांनी यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.