
छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात वर्ग १०च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
.देवरी:- स्थानिक छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, देवरी येथे वर्ग १० च्या विद्यार्थ्यांकरिता” निरोप समारंभाचा” कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. जी. भुरे तसेच प्रमुख अतिथी संदेश मेश्राम पत्रकार, भारती भेंडारकर , राजकुमारजी भुते , धनराज धानगाये हे होते. यावेळी प्रथमतः माँ शारदा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर वर्ग ९ च्या विद्यार्थ्यांनी वर्ग १० च्या विद्यार्थ्यांना निरोप दिला. यावेळी आपल्या मनोगतातून वर्ग १० च्या विद्यार्थ्यांना अनेक आठवणीसह गीत व भाषणातून मनोगत व्यक्त केले. वर्ग १० च्या विद्यार्थ्यांनी आपल्या या शाळेतीलआठवणी सांगितल्या. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्यांनी सत्र २०२४-२०२५ मधील “आदर्श विद्यार्थी” म्हणून कु याचिका कोरे या विद्यार्थ्यांनीची निवड करण्यात आली. स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छासह मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी सूचना व काॅपिमुक्त वातावरणात आपण परीक्षेला सामोरे जावे असे मार्गदर्शन केले. यानंतर वर्ग १० च्या विद्यार्थ्यांना काॅपिमुक्तीची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम आर तांडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन कु दिशा ऊके व कु साक्षी लाडे यांनी केले.आभार प्रदर्शन जय दरवडे शाळानायक याने केले.