देवरी : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये १७ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या प्रमाणपत्र परीक्षेच्या भौतिकशास्त्राच्या पेपर फुटीची देवरी तालुक्यात चर्चा होती. मात्र ती चर्चाच असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. परंतु, शिक्षण विभागाच्या तब्बल पाच पथकाची सतत लागोपाठ देवरीच्या केन्द्रावर जाऊन परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याची चौकसी केली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला परंतु गैप्रकारावर आड बसला असल्याचे तालुक्यात चर्चा रंगल्या आहेत.
देवरी तालुक्यातील तिन्ही परीक्षा केंद्रांवर उपस्थित महसूल विभागाचे पथक, नियमित पोलिस आणि गृहरक्षक सुरक्षा रक्षक, शिक्षण विभागाचे सहाय्यक परीक्षक आणि संबंधित तिन्ही परीक्षा केंद्रांचे केंद्र संचालक यांच्याकडून लेखी उत्तर घेण्यात आले आहे आणि त्या आधारे असे म्हणता येईल की, तिन्ही परीक्षा केंद्रांवर अशी कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. त्यामुळे, जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी विद्यार्थी आणि पालकांना अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नका आणि पुढील परीक्षेवर लक्ष केंद्रित करा असे आवाहन केले आहे.
वारंवार भरारी पथक परीक्षा स्थळी येऊन व विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात एक भीतीचे वातावरण निर्माण झाली त्यामुळे विद्यार्थी आपले पेपर व्यवस्थितपणे सोडवू शकले नाही. असे आरोप देखील काही पालकांनी केलेले आहेत.









