Deori :मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम”घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उपमुख्याध्यापक श्री एस.टी.हलमारे, प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक आर.डब्ल्यू.नागदेवे, श्री.राजू मासूरकर, श्री.बावनकर सर, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी मतदार दिनाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली, या स्पर्धेचे परीक्षक श्री.प्रभू मनगटे, अनिल मेश्राम सरांनी परीक्षणाचे कार्य पार पाडले.त्याचबरोबर निबंध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे मुल्यमापन अश्विनी झंजाळ मॅडम यांनी केले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवून स्पर्धेत रंगत आणली.माननीय अध्यक्ष एस.टी.हलमारे सरांनी अनेक दाखले देवून मतदार दिवसाचे महत्व पटवून दिले.अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी झंजाळ मॅडम यांनी केले तर आभार रासेयो प्रमुख जगदीश खेडकर यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेवक, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व समस्त कर्मचारी यांनी सहकार्य केले.









