प्रा.आर. डी. कटरे यांची आरटीई फाऊंडेशन महाराष्ट्र जिल्हा गोंदिया च्या राज्यअध्यक्ष पदी बिनविरोध निवड

गोंदिया :- आरटीई फाऊंडेशन महाराष्ट्र जिल्हा गोंदिया ची सभा हॉटेल ग्रँड सीता मध्ये आयोजित करण्यात आली. सभेत राज्य स्तरीय कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्यकारिणी मध्ये प्रा. आर. डी. कटरे सचिव श्री तुलसी शिक्षण संस्था गोरेगाव यांची राज्यअध्यक्ष करिता बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सुनील एल. आवळे गोंदिया यांची राज्य सचिव, योगेंद्र टी.कटरे खैरबोडी राज्य उपाध्यक्ष, खलीलखान पठाण गोंदिया सहसचिव, हिमांशू तेजशिंग बिसेन गोंदिया कोषाध्यक्ष, यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे शीवेंद्रकुमार येडे गोंदिया, विष्णुदयाल बीसेन एकोडी, प्रकाश पंचभाई गोरेगाव, पौर्णिमा गोंडाने गोंदिया, ज्योती दिनेश गुप्ता गोंदिया, प्रफुल भालेराव गोंदिया, प्रशांतकुमार लील्हारे गोंदिया, अनिलकुमार येरणे देवरी, राजेन्द्र बडोले सालेकसा, संतोष राऊत सौंदड यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. राज्यअध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कार्यकारिणी द्वारे प्रा.आर.डी.कटरे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. सभेप्रसंगी नवनियुक्त राज्यअध्यक्ष प्रा. आर. डी. कटरे यांनी राज्य कार्यकारिणी गठित करण्यामागचे उद्देश व नियमावलीची जाणीव सर्व सभासद यांना करून दिली. तसेच सर्वांनी मिळून फाऊंडेशन ला सहकार्य करावे असे आव्हान केले. या आरटीई फाऊंडेशन महाराष्ट्र गोंदिया च्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या संस्था संचालकांना शालेय स्तरावर येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न सतत करू अशी हमी दिली.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें