
उशीरा जन्म-मृत्यूची नोंद आता झाली बंद
■ प्रशासनाच्या निर्णयामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ
गोंदिया : उशिरा जन्म-मृत्यू नोंदी बाबत श्शासनाने आदेश काढ्न तहसिलदारांमार्फत नोंदीचा अधिकार देऊन महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र, शासनाने या निर्णयावर स्थगिती देत पुढील आदेशापर्यंत जन्म-मृत्यू नोंद बंद ठेवण्याचे आदेश काढून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याने उशीरा जन्म-मृत्यू नोंद करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली असून अडचणीत वाढ झाली आहे.
भारत शासन राजपत्राद्वारे जन्म-मृत्यू नोंदणी कायदा, १९६९ मध्ये सुधारणा करून उशिरा जन्म-मृत्यू नोंदणी संबंधिचे अधिकार जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, या सुधारणेनुसार उशिरा जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात आलेली कार्यवाही संदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणावर मतक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारीची चौकशी करण्याकरिता गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. सुधारणने नुसार उशिरा जनम्-मृत्यूप्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही ठप्प राहणार आहे.
तक्रारीची चौकशी एसआयटी करणार
उशिरा जन्म-मृत्यू नोंदी बाबत राज्य शासनाकडे विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. तक्रारीची चौकशी गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथकाद्वारे (एसआयटी) करण्याचा निर्णय शासनाने घेतला अहो. कायद्यात सुधारणा झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहे. मात्र, तक्रारी वाढल्या १९६९ मध्य जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यात सुधारणा केली होती. उशिरा जन्म-मृत्यूच्या नोंदी बाबत शासनाने आदेश काढत २१ जानेवारी पासून जन्म-मृत्यु नोंद प्रकरण स्विकारणे बंद केले आहे. शासनाने पुढील आदेश काढलयावर नोंद केली जाईल