देवरी प्रीमियर लीग क्रिकेट चे थाटात उद्घाटन

देवरी : येथील DPL सिजन ३ सामन्याचा रंगारंग उद्घाटन संपूर्ण क्रिकेट रसिक मंडळींचे लक्ष लागून राहिलेल्या देवरी येथील DPL सामन्याचा रंगारंग उद्घाटन सोहळा जिल्हा परिषद ग्राउंड मध्ये पार पडला. मनोरंजनाची खचाखच मेजवाणी असलेल्या या सोहळ्यात क्रिकेट प्रेमींचा एकच जल्लोष पाह्यला मिळाला. उद्घाटन सोहळा अनिल बिसेन उपसभापती देवरी यांच्या अध्यक्षतेखाली, सविता पुराम महिला व बालकल्याण सभापती गोंदिया यांच्या हस्ते पार पडला. उद्घाटना दरम्यान नितेश वालोदे सामाजिक कार्यकर्ता, सुजित अग्रवाल, यादोराव पंचमवार, टेंभरे गुरुजी, जमील खान, रवी काळे, दीपक अग्रवाल, नरेश धरमशहारे, निनावे सर, जय साखरे, पोकेश मुलतानी, सुरेंद्र मोहबे, शोहेब शेख, जफर कुरेशी, भूषण गायधने, बिट्टू पारधी तसेच इतर क्रिकेट रसिक मंडळी उपस्थित होते.

Share