शांती मार्च काढून सीख बांधवांनी साजरा केला विर बाल दिवस
देवरी – गुरू गोविंदसिंगजी यांच्या साहिबजादांनी लहान वयातच मातृभूमी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे शौर्य हा आपल्या भारत देशाचा वारसा आहे. त्यांच्या स्मरणात वीर बाल दिवस दरवर्षी 26 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने देवरी येथील सिख बांधवांनी शहरात शांती मार्च काढत गुरुगोविंद सिंग जी व त्यांचे साहेबजादे यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत वीर बाल दिवस साजरा केला. वीर बाल दिवसाच्या अनुशंगाने गुरुद्वारा गुरु सिंग सभा येथून शांती मार्च काढण्यात आला हा शांती मार्च गुरुद्वारापासून, पंचशील चौक, दुर्गा चौक, नॅशनल हायवे ,राणी दुर्गावती चौक, चिचगड रोड ते गुरुनानक चौक दरम्यान काढण्यात आला. या शांती मार्च मध्ये सर्व शीख समाजातील स्त्री पुरुष,लहान मुले मुली पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये सहभागी झाले होते.गुरुनानक चौक येथे गुरू गोविंद सिंग,चार साहिबजादे,तसेच माता गुजरी यांच्या प्रतीमेसमोर मोमबत्ती जाळून व पुष्प अर्पण करून सर्व शीख बांधव व भगिनी यांनी अभिवादन केले. श्री गुरुद्वारा गुरु सिंग सभा व खालसा सेवा दल द्वारा काढण्यात आलेले या शांती मार्चमध्ये गुरुद्वारा गुरु सिंग सभा अध्यक्ष परमजितसिंग भाटिया, सचिव सात्विंदर सिंग भाटिया, कुलवंतसिंग भाटिया,प्रितमसिंग भाटिया, अनुपसिंग भाटिया,बंटी भाटिया,विजय भाटिया,डिंपल भाटिया, रिशी भाटिया,शैंकी भाटिया, इंदरजितसिंग भाटिया, बब्बु सलुजा, विंकल भाटिया,राजा भाटिया,तसेच शेकडो शीख बांधव व भागिनी सहभागी झाल्या होत्या.गुरुनानक चौक येथे अभिवादन केल्यानंतर गुरुद्वारा गुरुसिंग सभा येथे गोंदिया चे रागी तनविरसींगजी व देवरीचे रागी कमलसिंगजी व अमरजितसींगजी यांनी आपल्या कीर्तनातून गुरू गोविंद सींगजी व त्यांच्या साहीबजादयांना स्मरण केले.यावेळी सर्व समाजबांधवांनी कीर्तनाचा लाभ घेतला.