विभागीय क्रिडा स्पर्धामध्ये देवरी आदिवासी विकास प्रकल्पाने 2018 नंतर प्रथमच पटकावले सर्वसाधारण उपविजेते पद
देवरी: आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत चिमुर, चंद्रपुर, भंडारा, देवरी, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भामरागड, अहेरी या 9 प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील 2983 विद्यार्थ्याच्या दि.19 ते 21 डिसेंबर 2024 पर्यत तालुका क्रिडा संकुल ब्रम्हपुरी येथे पार पडलेल्या तीन दिवसीय विभागीय क्रिडा स्पर्धेत देवरी प्रकल्पाने ६ वर्षानंतर प्रथमच सर्वसाधारण उपविजेते पद प्राप्त् केले आहे.
19 वर्षाखालील मुले खो-खो, 17 वर्षाखालील मुले कबड्डी,खो-खो, रिले 4×100 मीटर 14 वर्षाखालील मुले कबड्डी, रिले 4×100 मीटर 19 वर्षाखालील मुली खो-खो, हॉलीबॉल, हँडबॉल, रिले 4×400 मीटर, रिले 4×100 मीटर 17 वर्षाखालील मुली खो- खो,हँडबॉल 14 वर्षाखालील मुली रिले 4×100 मीटर या सर्व सामन्यात देवरी प्रकल्पाने प्राविण्य प्राप्त केले. विभागीय क्रिडा स्पर्धांमधून सांघिक खेळांमध्ये ५८ विद्यार्थी तर १३ विद्यार्थ्यांची वैयक्तीक खेळांमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा नागपूर येथे दिनांक 3 ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे.
या क्रीडा स्पर्धाँमधील यशासाठी प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांचे सूक्ष्म नियोजन कारणीभूत ठरले त्यांनी क्रीडा शिक्षकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांचा आत्मविश्वास वाढविला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे 4 दिवसाचे सराव शिबिर आयोजित करून विद्यार्थ्यांना बाहेरील प्रशिक्षित प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळवून दिले यामुळे विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले तसेच यामध्ये डॉ. सायली चिखलीकर, इतर सर्व सहाय्यक प्रकल्प अधिकारी सर्व क्रीडास्नेही शिक्षक, मुख्याध्यापक, गृहपाल, अधिक्षक,प्रशिक्षक आणि प्रकल्प कार्यालयातील सर्व इतर अधिकारी आणि इतर कर्मचारी यांचे सर्वांचे एकत्रित प्रयत्नाने हा विजय साकार झाला असे प्रकल्प क्रीडा समन्वयक श्री सुनील भुसारी यांनी सांगितले.
वैयक्तिक स्पर्धेत राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी
- वैभव ब्राह्मणकर (जमाकुडो)
- चेतन मडावी (कडीकसा) –
- त्रिवेणी कोराम (बोरगाव)
- संध्या भोयर (बोरगाव)
- माया नरेटी (बोरगाव)
- आशा चुलपार (शेंडा) –
7.सुभाष कुंभरे (पुराडा) - मनिष सहाळा (देवलगाव)
- आकाश वट्टि (सिरेगावबांध)
- जयकुमार कमरो (सिरेगावबांध)
- हसिना सोनवाने (म्हैसुली)
- विशाखा सलामे (इळदा)
- राघणी बघवा (केशोरी)