राज्यस्तरीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेत पुणे विभागाचे वर्चस्व

देवरी – येथील क्रीडा संकुल मध्ये आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेत पुणे विभागाने तिन्ही गटात बाजी मारली. पहिल्यांदाच देवरी सारख्या अतिदुर्गम ठिकाणी राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेचा थरार देवरिकरांनी अनुभवला. दि.२३ रोजी या राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेचे उद्घाटन आ.संजय पुराम यांचे हस्ते उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी विशेष अतिथी म्हणून नित्यानंद झा अप्पर पोलिस अधीक्षक, उमेश काशीद प्रकल्प अधिकारी महेंद्र गणवीर तहसीलदार, वीरेंद्र अंजनकर संघटन मंत्री अनिल बिसेन उपसभापती, यादवराव पंचमवार सामाजिक कार्यकर्ते, नंदा खुरपुडे जिल्हा क्रीडा अधिकारी हे उपस्थित होते. यावेळी आ.संजय पुराम यांनी स्पर्धकांना संदेश देताना म्हणाले. जोखीम पत्करा. जोखीम घेतल्याशिवाय यश मिळत नाही. खेळाला जीवनात जरी महत्व असले. तरी खेळासोबत अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.कारण अभ्यासाविना ५ वर्षाची खुर्ची मिळविता येते परंतु शिक्षण नसेल तर ६० वर्षाची खुर्ची मिळविता येने कठीण आहे. करीता अभ्यास करून मोठे अधिकारी व्हा. असा मोलाचा संदेश त्यांनी शालेय स्पर्धकांना दिला. या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या आठ विभाग व क्रीडा प्रबोधिनी पुणे येथील एकूण ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. ज्यात १४, १७ व १९ वयोगटातील मुला – मुलींनी सहभाग घेतला होता.स्पर्धा बघण्याकरीता देवरिकरांनी एकच गर्दी केली होती.तिन्ही वयोगटात पुणे विभागातील स्पर्धकांनी यश संपादन करीत स्पर्धा गाजविली. विजेता स्पर्धकांना तहसीलदार महेंद्र गणवीर,जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, प्राचार्य डॉ. सुजित टेटे,पत्रकार विलास शिंदे, मुख्याध्यापिका रजिया बेग यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.स्पर्धेचे पंच म्हणून राष्ट्रीय कोच दिपाली पाटील, दिपाली श्रीधर व मीनाक्षी शिंदे यांनी काम पाहिले.तर राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी ए.बी. मरस्कोल्हे क्रीडा मार्गदर्शक एन. एस. उईके ,अविनाश निंबार्ते, वीनेश फुंडे ,कुलदीप लांजेवार,शिवचरण चौधरी, अंकुश गजभिये, जितू पालांदुरकर, आलोक सर यांनी सहकार्य केले. हे ठरले स्पर्धेचे विजेते…. १४ वर्ष वयोगट मुले (मास स्टार्ट) प्रथम – रुद्र पाटील कोल्हापूर,द्वितीय – रुद्र पाखरे अमरावती, तृतीय – राजवर्धन शिंदे कोल्हापूर. १४ वर्ष मुले (टाईम ट्रायल). प्रथम -ध्रुव बांदल कोल्हापूर, द्वितीय हर्षल पांचाळ पुणे ,तृतीय अथर्व बसुगडे कोल्हापूर, १४ वर्ष मुली ( मास स्टार्ट). प्रथम प्रचिती खताळ पुणे, द्वितीय समीक्षा देवणे लातूर ,तृतीय अनया लोबो मुंबई. १४ वर्ष मुली (टाईम ट्रायल). प्रथम- ज्ञानेश्वरी माने पुणे द्वितीय- सृष्टी जगताप पुणे तृतीय -अर्णवी सावंत कोल्हापूर. १७ वर्ष मुले (मास स्टार्ट). प्रथम -ओंकार आंधळे पुणे द्वितीय -शंभूराजे यादव तृतीय- वेदांत पानसरे मुंबई 17 वर्ष (टाईम ट्रायल ). प्रथम – राज करांडे पुणे, द्वितीय -प्रणय चीनगुडे लातूर, तृतीय – हुजैका मुल्ला कोल्हापूर १७ वर्ष मुली (मास स्टार्ट ). प्रथम – आभा सोमन पुणे, द्वितीय- गायत्री तांबवेकर पुणे , तृतीय -श्रावणी कासार पुणे. 17 वर्ष (टाईम ट्रायल). प्रथम- श्रावणी करीत पुणे,द्वितीय- मानसी महाजन पुणे, तृतीय -श्रावणी घोडेस्वार कोल्हापूर. 19वर्ष मुले (मास स्टार्ट). प्रथम क्रमांक – निहाल नदाक सांगली, द्वितीय -हरीश डोंबाळे पुणे, तृतीय -नरेंद्र सोमवंशी लातूर. १९ वर्ष मुले (टाइम ट्रायल ). प्रथम -विप्लव मानगुटे पुणे, द्वितीय – हर्षवर्धन बाबर सांगली, तृतीय -आदित्य पाटील कोल्हापूर 19 वर्ष मुली (मास स्टार्ट). प्रथम- आसावरी राजमाने पुणे, द्वितीय -ऋत्विक रोजुल पुणे ,तृतीय -जेसीस डिमेलो मुंबई. 19 वर्षे मुली (टाईम ट्रायल) प्रथम – जुई नारकर मुंबई ,द्वितीय -आकांक्षा म्हेत्रे जळगाव, तृतीय – प्रेरणा कठके पुणे.

राज्यस्तरीय स्पर्धा आणि नियोजनाचा अभाव,आमदारांनी केली नाराजी व्यक्त. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील देवरी येथे पहिल्यांदाच एखाद्या खेळाची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली. परंतु जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे स्पर्धेचा प्रचार प्रसार योग्य पद्धतीने न केल्याने व क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांना या स्पर्धेची माहिती दिली नसल्याने क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी मंचावरूनच अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. व यानंतर अशा पद्धतीचे ढिसाळ नियोजन होणार नाही याकडे लक्ष देण्याचे सुचविले.

Share