क्रीडा म्हणजे आरोग्यदायी जीवनाचे मूलमंत्र: रवी काळे
🔺ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे क्रिडा सत्राचे थाटात उद्घाघाटन
देवरी: ब्लॉसम स्कुल येथे १६ व्या वार्षिक क्रीडा सत्राचे थाटात उदघाटन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देवरीचे प्रसिद्ध क्रीडा प्रशिक्षक रवी काळे, डॉ. पोकेश मुलतानी , प्राचार्य डॉ सुजित टेटे , क्रीडा शिक्षक अजित टेटे, राहुल मोहुर्ले आणि भोजराज तुरकर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात स्वागत समारंभ लेझीम, डंबल्स प्रदर्शन आणि फीत कापून करण्यात आली.
क्रीडा म्हणजे आरोग्यदायी जीवनाचे मूलमंत्र असून त्यामध्ये आपले करिअर करता येते. शालेय जीवनातील खेळाचे महत्व या विषयावर प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्राचार्य सुजित टेटे यांनी खेळातील विजय आणि पराजय या दोन्ही नाण्याच्या बाजू आहेत त्यामुळे खचू नका पुन्हा प्रयत्न करा असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मोहूर्ले यांनी केले आभार प्रदर्शन नितेश लाडे यांनी मानले. यावेळी शाळेतील विश्वप्रीत निकोडे, राजू सोरते, संगीता काळे, तेजस्विनी नंदेश्वर, आरती चौधरी तसेच सर्व शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावली.