लोहारा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेची वार्षिक सभा २० सप्टेंबरला

देवरी : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, लोहारा (ता. देवरी, जि. गोंदिया) या संस्थेची सन २०२५-२०२६ या वर्षाची वार्षिक साधारण सभा रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही सभा लोहारा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या खरेदी केंद्रावर होणार आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सभेत मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून त्यास कायम करणे, सन २०२५-२०२६ या वर्षाचा जमा-खर्च, नफा-तोटा व ताळेबंद पत्रकास मंजुरी देणे, लेखापरीक्षण अहवालावर चर्चा करून दोषदुरुस्ती करणे तसेच सन २०२६-२०२७ करिता लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

याशिवाय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे. सभेस आवश्यक गणपूर्ती न झाल्यास नियमानुसार त्याच दिवशी एक तासानंतर सभा घेण्यात येईल.

सभासदांना कोणतेही प्रश्न विचारायचे असल्यास ते सभेच्या सात दिवसांपूर्वी लेखी स्वरूपात संस्थेच्या कार्यालयात सादर करावेत, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

संस्थेचे अध्यक्ष राजेश हरीभाऊ राऊत व सचिव रवींद्र गणेशराम नाईक यांनी सर्व सभासदांना वार्षिक सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें