श्वान लुसी आणि जॅक यांना रौप्य व कांस्य पदक
प्रहार टाईम्स: पुणे येथे पार पडलेल्या 19 व्या पोलीस कर्तव्य मेळावा– 2024 मध्ये उत्तुंग भरारी घेत गोंदिया श्वान पथक येथील “अंमली पदार्थ शोधक –श्वान लुसी आणि गुन्हे शोधक श्वान जॅक” यांना रौप्य व कांस्य पदकानी सन्मानित करण्यात आले.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्रीमती- रश्मी शुक्ला,, अप्पर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे प्रशांत बुरडे, पोलीस अधीक्षक श्रीमती पल्लवी बर्गे, यांचे मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत दिनांक- 07-12-2024 ते दिनांक 12-12-2024 या दरम्यान कालावधीत राज्य राखीव पोलीस बल गट, रामटेकडी पुणे येथे 19 व्या पोलीस कर्तव्य मेळावा-2024 चे आयोजन करण्यात आले होते.
पुणे राज्य राखीव पोलीस बल गट, रामटेकडी येथे पार पडलेल्या 19 व्या पोलीस कर्तव्य मेळावा- 2024 मध्ये संपुर्ण महाराष्ट्रातील गडचिरोली, नागपुर, अमरावती, संभाजी नगर, कोल्हापूर, मुंबई, पुणे, ठाणे, परिक्षेत्रातील जिल्ह्यांनी विविध स्पर्धा मध्ये सहभाग नोंदवला. ज्यात प्रामुख्याने श्र्वानांच्या पार पडलेल्या विविध स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील साधारण 20 जिल्ह्याचे श्र्वांनानी सहभाग नोंदवला होता. ज्यामध्ये गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस पथक गोंदिया येथील श्वान हस्तकासह श्वान लुसी व श्र्वान जॅक ने सुध्दा सहभाग नोंदवला होता. पुणे येथे पार पडलेल्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात झालेल्या स्पर्धा मध्ये उत्तुंग भरारी घेत दर्जेदार कामगिरी करत *”श्वान लुसी, ने *रौप्य पदक आणि श्र्वान जॅक” ने कांस्य पदक** प्राप्त करून गोंदिया जिल्हा पोलीस दलाचा गौरव व नावलौकिक वाढविला आहे.. पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया नित्यानंद झा, पोलीस उप-अधिक्षक (मुख्या.) नंदिनी चानपुरकर, यांनी प्रभारी अधिकारी श्वान पथक गोंदिया पो.उप.नि. सतिश सिरीया, श्वान लुसी व हस्तक पो.हवा. विजय ठाकरे, श्वान जॅक व हस्तक पोहवा रॉबीनसन साठे, यांचे अभिनंदन कौतुक केले आहे.