देवरी नगरपंचायत क्षेत्र हद्दीतील राज्य मार्गालगत असलेल्या शाळा/महाविद्यालय, शासकिय निमशासकिय संस्था यांच्यासमोर बॅरीगेट लावा

विविध संघटनेचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन

देवरी : अपघातातील वाढलेले प्रमाण बघता अपघातांना आळा घालण्यासाठी देवरी येथील तरुणानी विविध संघटनेच्या माध्यमातून निवेदन सादर केले. सद्याच्या वर्तमान परिस्थितीमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या झपाटयाने वाढत असुन त्यांसोबत वाहन चालविण्याचा वेग सुद्धा तेवढयाच झपाटयाने वाढला असुन त्या नियमबाह्य वेगाने वाहन चालविण्याचे निष्पापाचे बळी शालेय विद्यार्थी आणि नागरिक ठरत आहेत.

मागील काही दिवसांचा काळ बधितला असतो राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्गालगत असलेल्या शाळा/महाविद्यालय, शासकिय-निमशासकिय संस्था या ठिकाणी रहदारी करणारे नागरिक शाळेकरी विद्यार्थी यांच्या वाहतुकीदरम्यान किंवा अश्या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने याची खबरदारी देवरी नगरपंचायत क्षेत्रात होणे अत्यंत महत्वाचे झाले असल्याणे स्थानिक नगरपंचायत देवरी क्षेत्रात नगरपंचायत प्रशासन आणि इतर प्रशासकिय यंत्रणेच्या माध्यमातून देवरी नगरपंचायत क्षेत्र हद्दीमधील राज्य महामार्गालगत असलेल्या शाळा/महाविद्यालय/शासकिय-निमशासकिय संस्था यांच्या कार्यालयासमोर आणि राष्ट्रीय महामार्ग ५३ (जुने ६) वरुन महत्वाच्या क्रासींग वरुन वर बॅरीगेट्स लावून भरधाव वेगाने चालणाऱ्या गतीवर आळा घालून नकळत होणऱ्या अपघातामुळे निष्पाप बळी जाणाऱ्यावर रोख आणता येईल करिता आपल्या नगरपंचायत प्रशासनाकडून खालील क्षेत्रामध्ये बॅरिगेट्स लावण्यात यावे तसेच होमगार्डस् किंवा पोलीसांची देवरी नगरपंचायत हद्दतीत वाढ करण्यात यावी. अशी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

१) शासकिय औद्योगी प्रशिक्षण संस्था देवरी समोर. २) ब्लॉसम पब्लीक स्कुल देवरी समोर. ३) अग्रसेन चौक देवरी. ४) राणी दुर्गावती चौक. ५) जि.प. हायस्कुल देवरी. ६) छत्रपती टी-पाइंट चिचगड रोड देवरी.७) मनोहरभाई पटेल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय चिचगड रोड देवरी.

वरील सर्व स्थानासमोर गती बॅरिगेट्स लाऊन वाढत्या अपघातावर आडा घालन्यासाठी सहकार्य करण्याकरिता तरुणांनी निवेदन सादर केले आहे.

Share