देवरीत खालसा प्रीमियर लीगचे थाटात उद्घाटन
देवरी (प्रहार टाईम्स) : गुरुद्वारा गुरूसिंह सभा देवरी आणि खालसा सेवा दल यांच्या संकल्पनेतून देवरी येथे खालसा प्रीमियर लीगचा थाटात उद्घाटन सोहळा संपन्न झाला असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देवरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संजू उईके, शिख समाजाचे पंजाबी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष , देवरी शीख समाजाचे प्रमुख पदाधिकारी, देवरी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच समाजातील सर्व महिला व बालगोपाल प्रामुख्याने उपस्थित होते.
समाजातील एकता कायम राहावी, समाजातील सर्व नागरिकांना खेळाच्या माध्यमातून मनोरंजन मिळावे , खेळाडूवृत्ती टिकावी या उद्देशाने खालसा प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शैंकी भाटिया आणि समाजातील कार्यकर्त्यांनी दिली. १३ डिसे. पासून १६ डिसे. पर्यंत सदर कार्यक्रम राहणार असून एकूण ८ चमूचे सहभाग झालेले आहे. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण १६ डिसें. ला होणार असून विविध क्षेत्रातील अतिथी उपस्थित राहणार आहेत.