2024 वर्षात आतापर्यंत रस्ता अपघातात 156 जणांचा बळी
प्रहार टाईम्स : महामार्ग आणि रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली असून मार्गावर भरधाव वेगाने जाणार्या वाहनांमुळे जीवघेणे अपघात होत असल्याचे चित्र आहे . गेल्या 11 महिन्यांत जिल्हाभरात झालेल्या 301 अपघातांत 156 जणांचा मृत्यू झाला तर 233 गंभीर जखमी झाले आहेत.
त्याद्वारे वेगावर नियंत्रण, हेल्मेटचा वापर, वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात वाहनचालकांमध्ये जागृती केली जात आहे. त्यामुळे गतकाळात काहीशी अपघातांची संख्या घटली आहे. मात्र, काही वाहनचालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घेत नाहीत त्यामुळे काहीवेळा जीवघेणे तर काहीवेळा गंभीर, किरकोळ अपघात घडतात. वाहनचालकाला अनावर झालेली झोप, अति वेग, मद्यपान करून वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे आदी प्रमुख कारणांमुळे अपघात होतात. जानेवारी ते नोव्हेंबर 2024 या 11 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण 301 अपघात झाले. या अपघातांमध्ये 156 जणांचा बळी गेला तर 233 जण गंभीर आणि 48 किरकोळ जखमींचा समावेश आहे. जखमींपैकी बहुतांश जणांना कायमचे अपंगत्व आले आहे.वेगावर नियंत्रण ठेवले, सीटबेल्ट, हेल्मेटचा वापर केला व नियमांचे पालन केले, तर अपघात कमी करणे शक्य आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करने गरजेचे आहे. रस्ता सुरक्षेविषयी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यावर वाहतूक विभागाचा भर आहे. नागेश भास्कर, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, गोंदिया.
अकरा महिन्यांतील अपघात व मृत्यू
महिना – अपघात – मृत्यू
जानेवारी – 17 – 08
फेब्रुवारी – 18 – 12
मार्च – 30- 17
एप्रिल- 33- 17
मे- 34- 15
जून- 35- 18
जुलै- 29- 13
ऑगस्ट- 27- 13
सप्टेंबर- 21- 11
ऑक्टोबर- 25- 09
नोव्हेंबर- 32- 23
एकूण- 301- 156