1962 पासून आमगाव विधानसभेवर भाजप अव्वल, 8 वेळा भाजप चा झेंडा
देवरी: विधान सभा निवडणुकीचे जोरदार वारे सुरू झाले असून भाजपच्या पहिल्या यादी मधे माजी आमदार संजय पुराम यांचा कमळ फुलला असून प्रतिस्पर्धी पक्ष अजूनही आपला उमेदवार रिंगणात उतरवू शकला नाही. यावेळी पुन्हा भाजप ने संजय पूराम यांच्या वर डाव लावला असून भाजप चा बालेकिल्ला खेचून आणण्यासाठी भाजप एक्टिव्ह मोड मधे आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर गोंदिया जिल्ह्यात एकूण ४ विधानसभा मतदार संघ अस्तित्वात आले. यामधे मागील इतिहास बघता आमगाव हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. सन १९६२ पासून २०१९ पर्यंत एकूण १३ सार्वत्रिक विधानसभा निवडणुका झाल्या यामधे तब्बल ८ वेळा भाजपचे उमेदवारांनी विजयाचा झेंडा रोवला आहे. तर फक्त चार निवडणुकीत कांग्रेसच्या उमेदवारांनी विजय प्राप्त करता आले. असे असले तरी २०१९ मध्ये भाजपच्या किल्ला भेदून काँग्रेसने आमगाव आपल्या ताब्यात घेतले आहे, त्यामुळे या किल्ल्याला पुन्हा खेचून आणण्यासाठी भाजपला चागंले शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहे.
आमगाव विधानसभा क्षेत्राला महाराष्ट्रात भाजपचे उगमस्थान माणले जाते. या विधानसभा क्षेत्रात जनसंघचा पायंडा रचण्यात आला. लक्ष्मणराव मानकर, महादेवराव शिवणकर या सारखे भाजपचे दिग्गज नेते या क्षेत्रातील आहेत. त्यांच्या संघटनात्मक कामगिरीमुळेच हा विधानसभा क्षेत्र भाजपचा बालेकिल्ला माणला जोता. एकेकाळी भाजपला राज्यात फक्त २ जागांवर विजय मिळविता आले होते, त्यात आमगाव विधानसभा क्षेत्राचा समावेश होता. मात्र बालेकिल्ल्याला भेदून काढण्यात काँग्रेसही मागे पडली नाही. सन १९७२ मध्ये काँग्रेसने हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. त्यानंतर सन १९९०, २००९ व २०१९ असे तीनदा भाजपकडून काँग्रेसने या बालेकिल्ल्याला हिसकावून घेतले. सन १९६२ च्या पहिल्या निवडणुकीत प्रजा समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला या क्षेत्रात प्रतिनिधीत्वाची संधी मिळाली होती. त्यानंतर १९६७ मध्ये जनसंघचा उमेदवार विजय झाला होता. सन १९७८ पासून सन १९८५ पर्यंत सलग तीनदा भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्याच प्रमाणे सन १९९५ पासून सन २००४ पर्यंत भाजपचा या क्षेत्रावर ताबा राहिला.आगामी विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी महत्वाची ठरणार आहे. मागील ५ वर्ष हा विधानसभा क्षेत्र काँग्रेसच्या ताब्यात असल्याने भाजपला या क्षेत्रात चांगलीच दमछाक करावी लागणार आहे.
विभानसभेत प्रतिनिधीत्व करणारे जनप्रतिनिधी
सन १९६२ – नारायण बहेकार (प्रजासपा)
सन १९६७ – लक्ष्मणराव मानकर (जनसंघ)
सन १९७२ – स्वरुपचंद अजमेरा (भाराकाँ)
सन १९७८ – महादेवराव शिवणकर (जनता पार्टी)
सन १९८० – महादेवराव शिवणकर (भाजप)
सन १९८५ – महादेवराव शिवणकर (भाजप)
सन १९९० – भरत बहेकार (भाराकाँ)
सन १९९५- महादेवराव शिवणकर (भाजप)
सन १९९९ – महादेवराव शिवणकर (भाजप)
सन २००४ – भेरसिंह नागपुरे (भाजप)
सन २००९ – रामरतन राऊत (भाराकाँ)
सन २०१४ – संजय पुराम (भाजप)
सन २०१९ – सहषराम कोरोटे (भाराकाँ)