गोंदिया जिल्ह्यात वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या 829 शाळा आजपासून सुरू 35544 विध्यार्थ्यानी लावली हजेरी

प्रहार टाईम्स

गोंदिया २७- जिल्ह्यात आज दुसऱ्या टप्प्यात वर्ग ५ वी ते ८ वी पर्यंतच्या 829 शाळा सुरु झाल्या असून ३५५४४ विद्यार्थ्यांनी आज पहिल्या दिवशी शाळेत हजेरी लावली आहे. या शाळेमध्ये शासकीय आणि खासगी शाळेचा देखील समावेश आहे.

तबल ११ महिन्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात ५ वी ते ८ वी चे शाळा सुरू झाल्या असून मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लॉकडाऊन लागताच राज्यातील सर्व खासगी तसेच शासकीय शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पहिल्या टप्यात वर्ग ९ ते १२ पर्यतच्या शाळा तसेच महाविद्यालय सुरु करण्यात आले होते. मात्र आज वर्ग ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरू झाल्या असून गोंदिया जिल्यात पहिल्याच दिवशी 829 शाळा सुरु झाल्या असून आज ६७२५१ पैकी ३५५४४ विद्यार्थ्यांनीच शाळेत हजेरी लावली. तर तब्ब्ल १० महिन्यानंतर आज शाळेत जायला मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क लावणे, वारंवार हात धुणे या बाबी विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या असून सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत शाळा सुरू राहणार आहेत.

Share