इंजी-प्रीति सचिन भांडारकर (नेताम ) तर्फे प्रभाग क्र. १६ मधे हळदीकुंकु कार्यक्रम उत्साहात साजरा

प्रहार टाईम्स

देवरी २७: देवरी प्रभाग क्रमांक १६ येथील रहवासी इंजी-प्रीति सचिन भांडारकर (नेताम ) यांचे राहते घरी प्रभागातील महिला एकत्र येऊन हळदीकुंकु कार्यक्रम व प्रभाग १६ चा मिलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला प्रभागातील महिलांची प्रामुख्याने उपस्थिति होती यामधे प्रमुख अतिथी म्हनून सौ-वैशाली उमाटे , सौ- नमिता दखने,रेखाबाई मेश्राम , सौ गीता खैरे , सौ निलु चौधरी , संध्याताई गाढवे , सौ प्रीतिताई उइके , आदि महिला मान्यवर उपस्थित होते. इंजी- सौ-प्रीति सचिन भांडारकर (नेताम ) यांनी कार्यक्रम प्रसंगी – स्त्री शिक्षण ,स्त्री पुरुष समानता , मतदानाचे महत्व आणि प्रभागाचे विकास कसे करता येणार या बाबींवर प्रकाश टाकला .

सुशिक्षित महिलाची शिक्षण क्षेत्र, सामाजिक कार्य आणि राजकारणातिल भूमिका आणि घडुन येणारे सामाजिक बदल याविषयावर चर्चा करण्यात आली.

प्रभागातिल महिलांनी सदर कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.

Print Friendly, PDF & Email
Share