कट रचुन वडिलाचा खुन करणाऱ्या आरोपी मुलास अखेर ३ वर्षांनी अटक
गोंदिया : कट रचुन वडिलाचा खुन करणाऱ्या आरोपी मुलास अखेर ३ वर्षांनी डुग्गीपार पोलीसांनी केले जेरबंद केले. सविस्तर असे की दि.१३/०६/०२१ चे १७/३० ते १८/३० वा. दरम्यान मृतक नामे– खुमराज बळीराम रहांगडाले वय ५५ वर्षे रा. म्हसवानी हा आपल्या घरुन मुलीची प्रकृती बरी नसल्याने तिचेकरीता औषधी आणण्याकरीता आपली स्वताची मो.सा.क्र. MH-35/AR- 7919 नी खोडशिवनी येथे गेला असता खोडशिवनी ते म्हसवानी रोडाचे कडेला मोटार सायकलसह पडलेला होता. त्याचे डोक्याचे डाव्या बाजुला मार लागल्याने रक्त निघत होते…परंतु अंधार पडल्यामुळे त्याला झालेल्या जखमा स्पष्ट दिसुन येत नव्हत्या त्याबाबत पोलीस स्टेशन डूग्गीपार येथे प्रथम त्याच्या पुतन्याने माहिती दिल्याने मर्ग.क्र. १६/०२१ कलम १७४ जा. फौ. अन्वये नोंद करण्यात आले होते..दि.१४/०६/०२१ रोजी वैदयकिय अधिकारी ग्रा. रु. स/अर्जुनी यानी प्रेताचे पोस्मार्टम दरम्यान मृतकचे कानाजवळ व डोक्यावर झालेल्या जखमा कोणत्यातरी धारदार हत्याराने वार करुन झाले असल्याचे सांगीतल्यावरुन मृतकचा भाऊ फिर्यादी नामे उदेलाल बळीराम राहांगडाले वय ५२ वर्ष रा. म्हसवानी यांचे जबाबा वरुन व प्राप्त पी.एम. रिपोर्ट वरुन पो.स्टे. ला अप.क्र.१५५/०२१ कलम ३०२ भादवि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयात खुनाचा कट रचणारा मुख सुत्रधार पाहिजे आरोपी मृतकचा मुलगा नामे– निखील खुमराज रहांगडाले रा. म्हसवाणी हा घटना तारखेपुर्वी पासुन बांग्लादेशात वास्तव्य करीत होता. सदर आरोपीला ताब्यात घेण्याकरीता आरोपीचा ब्युरो ऑफ इमेंग्रेशन ऑफीस येथुन लुक आउँट सर्कुलर नोटीस काढण्यात आला होता. सदर आरोपी हा तिन वर्षानंतर बांग्लादेशातुन भारतात इंदिरा गांधी विमानतळ येथे आला व परत बांग्लादेशात जाण्याच्या तयारीत असतांना त्यास इमेंग्रेशन ऑफीस नवी दिल्ली यांनी ताब्यात घेतले. त्यांनतर तात्काळ डुग्गीपार पोलीस पथक नवी दिल्ली येथे रवाना होऊन सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे….सदर गुन्हयाचा पुढिल तपास पो.नि. मंगेश काळे पो. ठाणे. डुगीपार हे करीत आहेत. सदरची कार्यवाही मा. श्री. गोरख भामरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, मा. श्री नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, मा. श्री विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. डुग्गीपारचे ठाणेदार श्री मंगेश बि. काळे, सपोनि. प्रमोद बांबोळे, पो.स्टॉप पो.हवा. जगदिश मेश्राम, दिपक खोटेले, पोशि रंजीत भांडारकर यांनी केली.