जुगार खेळणे/ खेळविणाऱ्या १ ईसमास २ महिन्यासाठी हद्दपार

देवरी: पोलीस निरीक्षक प्रविण डांगे पोलीस स्टेशन देवरी यांनी पोलीस स्टेशन देवरी हद्दद्दीमधील इसम नामे राकेश दुलीचंद चव्हाण वय. ३२ वर्षे रा. वार्ड क्र.१३ देवरी ता.देवरी जि. गोदिया हा जुगार खेळ खेळणे/खेळवित असल्याने सदर इसमावर यापुर्वीही देवरी पोलीस स्टेश्नला वारंवार गुन्हे दाखल केलेले आहेत. तसेच त्याला अप क्रमांक ३१३/२०२३ यामध्ये मा. न्यालयाकडुन शिक्षा मिळाली व त्याचेवर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आलेली आहे. तरीही त्याच्या वर्तवणुकीत कोणताही बदल झालेला नुसन त्याने त्याचे बेकायदेशीर कृत्यांची कृती चालुच ठेवलेली आहे. त्यामुळे प्रचलित कायदयांन्वये कारवाई करुन सुध्दा त्याचे वर्तणात कोणताच बदल होत नाही व कायदयाच्या धाक त्याचे मनात उरलेला दिसुन येत नाही. त्यांचे वागणुकीमुळे देवरी शहरातील नवयुक, शाळा महाविदयालयातील विद्यार्थी असे सामाजिक संवेदनशिल घटकातील तरुणवर्ग या बाबीस बळी पडत आहेत. अशाप्रकारचे बेकायदेशिर कृत्ये रोखण्यासाठी, व त्याची दहशत कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक गोरख भामरे गोंदिया, नित्यानंद झा अपर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सा. देवरी यांचे मार्गदर्शनात व सुचणेप्रमाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५७ (१), (५) म.पो.का प्रमाणे प्रस्ताव तयार करुन पाठविले असता सदर प्रकरणाची कविता गायकवाड उपविभागिय दंडाधिकारी देवरी यांनी चौकशी व सुनावणी करुन नमुद इसमाला देवरी, आमगाव, सालेकसा या तालुक्याच्या बाहेर ०२ महिन्याकरीता द्ददपार केले आहे.

Share