देवरी दसरा उत्सवाची जय्यत तयारी, हरियाणाचा बजरंगी ठरणार आकर्षण

देवरी 13: दसरा उत्सव समितीची जय्यत तयारी सुरु असून नगरपंचायत देवरी च्या भव्य पटांगणावर 51 फुटाचा आकर्षक रावणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. दसरा निमित्ताने आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी देवरावाशीयांना अनुभवायास मिळणार आहे. विशेष म्हणजे हरियाणाच्या बजरंगीची एंट्री केंद्रबिंदू ठरणार असून धुकेश्वरी मंदिरापासून शोभायात्रा निघणार आहे.

हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट मांडून पुजा केली जाते यास घटस्थापना असे म्हणतात. घट 9 दिवसाचे असून यास नवरात्र असे म्हणतात. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात.निश्चितच यावर्षीच्या दसरा उत्सवाची देवरीकर आतुरतेने वाट बघत आहेत.

सदर दसरा उत्सव समिती (सूपर २३ )दरवर्षी हा सण साजरा करीत असून यामध्ये खालील सदस्यांचा मोलाचा सहकार्य असतो.

१) आफ़ताब शेख़
२)काक्के भाटिया
३) शेंकी भाटिया
४) धनवंत कळंबे
५)अर्पित जैन
६) रतनेश असाटी
७)अनिल येरणे
८) अंशुल अग्रवाल
९) गोपाल तिवारी
१०) शुभम साहु
११) राजेश साहु
१२) युवराज मेश्राम
१३) प्रवीण दहिकर
१४) विजय गहाने
१५) सचिन बावरिया
१६) रितेश अग्रवाल
१७) भूषण मस्करे
१८) अमित गुप्ता
१९)विनोद गभने
२०) पुष्पकुमार गांगबोईर
२१) आशीष अंबिलकर
२२) यादवराव पंचमवार
२३) शंभू अग्रवाल

यांच्या संकल्पनेतून दसरा उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी अग्निशमन आणि रुग्णवाहिका तसेच पोलीस सुरक्षा विषयी खबरदारी घेतली असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Share