भंडाऱ्याच्या तहसीलदार विनीता लांजेवार निलंबीत !

भंडारा  : भंडाऱ्याच्या तहसीलदार विनीता लांजेवार यांनी त्यांना अधिकार नसताना अकृषक परवानगीचे आदेश दिले. पदाचा गैरवापर केल्याने त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली. याबाबत त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत महसूल वन विभागाने त्यांना निलंबित केले आहे. या कालावधीत लांजेवार यांचे मुख्यालय भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय लांजेवार यांना मुख्यालय सोडता येणार नाही. भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी लांजेवार यांची तक्रार केली होती. निलंबित होणाऱ्या लांजेवार या सलग दुसऱ्या तहसीलदार आहेत. यापूर्वी तहसीलदार हिंगेसुद्धा एका वेगळ्या प्रकरणात निलंबित झाले होते. पोलिस पाटलांच्या प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते. हिंगेंच्याही प्रकरणात आमदार भोंडेकर यांनीच तक्रार केली होती. त्यामुळे याता भंडाऱ्यात तहसीलदार म्हणून येण्यासाठी अधिकारी कचरत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Share