अतिदुर्गम भागातील चिमुकल्यांना मदतीचा हात..
●दिनबंधु ग्रामीण विकास संस्था व पोलीस विभागाचा संयुक्त उपक्रम.
● ५ जिल्हा परिषद शाळांच्या १२२ विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्याचे वितरण.
देवरी ◾️तालुक्यातीलअतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात असलेल्या जिल्हा पोलीस दल गोंदिया अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र मगरडोह भागातील विद्यार्थ्यांमद्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या साठी देवरी येथील दिनबंधु ग्रामीण विकास संस्था तसेच जिल्हा पोलीस दल गोंदिया अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र मगरडोह यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस दलाच्या दादालोरा एक खिडकी-एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद च्या अतिदुर्गम भागात वसलेल्या ५ शाळांच्या १२२ विद्यार्थांना वर्षभर उपयोगी पडेल इतक्या शालेय साहित्याचे वितरण दिनबंधु ग्रामीण विकास संस्था आणि सशस्त्र दुरक्षेत्र मगरडोह यांच्या वतीने करण्यात आले.यामद्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोपा,ढोडरा,सुकडी,रामगड, मगरडोह या शाळांचा समावेश असून या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे,अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली तर सशस्त्र दुरक्षेत्र मगरडोह चे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष गुट्टे,दैनिक लोकमत तालुका प्रतिनिधी विलास शिंदे,सामाजिक कार्यकर्ता संदीप महोबिया,युगेश बिसेन,संस्थेचे विश्वस्त दिपक लांजेवार,शालेय साहित्य वितरणवेळी ग्राम पंचायत सुकडी चे सरपंच कामेश्वर कल्लो,पोलीस पाटील मोरेश्वर पुराम,सामाजिक कार्यकर्ते भीमराव ताराम, सर्व जि.प.शाळांचे मुख्याध्यापक एम.सी.हुंडरा,व्ही.एम.खोब्रागडे, कु.एस.सी.कुंभरे,एस.एम.घळे, वाय.एस.गाढवे यांच्या हस्ते या सर्व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करण्यात आले यासोबतच उपस्थित सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना उपस्थितीतांनि शैक्षणिक विकासाबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांना अंकलिपि,नोटबुक, चित्रकला वही ,पेन,पेन्सिल,इतर शालेय वस्तू मिळताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.यांच्यासह सर्व ठिकाणातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेच स्वयंसेवक,पोलीस कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य केले.