जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धा २०२४ उत्साहात संपन्न
नृत्य स्पर्धेत एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल बोरगाव, देवरी प्रथम तर अ.जा. व नवबौद्ध शा. निवासी शाळा, नगपुरा मुर्री द्वितीय क्रमांकावर
गोंदिया: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदिया व शिक्षण विभाग जि. प. गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धा दिनांक २६ सप्टेंबर २०२४ ला पी.पी. कॉलेज ऑफ एजुकेशन, गोंदिया च्या सभागृहात पार पडल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. नरेश वैद्य (प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया) तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेंद्र निकोसे (प्राचार्य, पी.पी. कॉलेज ऑफ एजुकेशन, गोंदिया), श्रीमती पूनम घुले (अधिव्याख्याता तथा विभागप्रमुख कला उत्सव), श्री कथलेवार, (प्राचार्य, मानकर डी.एड. कॉलेज आमगाव) हे उपस्थित होते.
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्गदर्शनात कला उत्सवाचे आयोजन केले जाते. यात गायन, वादन, नृत्य, नाट्य, दृश्यकला आणि पारंपारिक गोष्ट वाचन अशा सहा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यातील शासकीय, अनुदानित, आश्रमशाळा, खाजगी विद्यालयातून विविध सहाही स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. स्पर्धेची सुरुवात सरस्वती पूजन करून करण्यात आली. प्रस्ताविक डायट अधिव्याख्याता पूनम घुले यांनी सादर केले. त्यात स्पर्धेचे स्वरूप, गुणांकन पद्धती, स्पर्धेचे नियम तथा घ्यावयाची काळजी या संबंधी विस्तृत मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे डॉ. राजेंद्र निकोसे व श्री कथलेवार यांनीही यथोचित असे मार्गदर्शन करून सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. नरेश वैद्य यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेचे महत्व, फायदे तथा जिंकणे किंवा हरणे यापेक्षा भाग घेणे महत्वाचे असते, हे सांगितले. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सहभागी झाले होते.
यांनी मिळवले क्रमांक—
१) गायन स्पर्धा – प्रथम क्रमांक – मनोहर भाई पटेल हायस्कूल देवरी
द्वितीय क्रमांक – डिम्पल कटरे, नवप्रतिमा हायस्कूल दवडी पार
तृतीय क्रमांक – उर्वशी नंदेश्वर, देवरी
२) वादन स्पर्धा – प्रथम क्रमांक- तुषार बुरले, न्यू मून इंग्लिश हायस्कूल, अर्जुनी मोरगाव
द्वितीय क्रमांक – भुवन वाटगुरे, जि. प. हायस्कूल, देवरी
तृतीय क्रमांक – सोहम टेकाम, सरस्वती विद्यालय, अर्जुनी मोरगाव
३) नाट्य स्पर्धा – प्रथम क्रमांक – अ.जा. व नवबौद्ध शा. निवासी शाळा, नगपुरा मुर्री
द्वितीय क्रमांक – अंजली लंजे, सरस्वती विद्यालय, अर्जुनी मोरगाव
तृतीय क्रमांक – इशा येडे , नवप्रतिमा हायस्कूल दवडी पार
४) नृत्य स्पर्धा – प्रथम क्रमांक – एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल बोरगाव, देवरी
द्वितीय क्रमांक – अ.जा. व नवबौद्ध शा. निवासी शाळा, नगपुरा मुर्री
तृतीय क्रमांक – शिवानी बाहेकर, सरस्वती विद्यालय, अर्जुनी मोरगाव
५) दृश्यकला स्पर्धा – प्रथम क्रमांक- स्नेहा भोयर,सरस्वती ज्यू. कॉलेज, अर्जुनी मोरगाव
द्वितीय क्रमांक – फिजा कुरेशी, रामकृष्ण विद्यालय कुऱ्हाडी
तृतीय क्रमांक – तन्वी रुखमोडे, न्यू मून इंग्लिश हायस्कूल, अर्जुनी मोरगाव
६) पारंपारिक गोष्ट वाचन स्पर्धा – प्रथम क्रमांक – जिज्ञासा आगाशे, एस.एस.गर्ल्स स्कूल गोंदिया,
द्वितीय क्रमांक – प्रिन्स पटले, स्व. ब्रिजलाल कटरे हायस्कूल, शहारवाणी
तृतीय क्रमांक – नैनशी शहारे, रामकृष्ण विद्यालय कुऱ्हाडी
यामधील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी विभागस्तरावर व राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतीनिधीत्व करणार आहेत. त्यांना डॉ. नरेश वैद्य, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आणि श्रीमती पूनम घुले, अधिव्याख्याता तथा विभागप्रमुख कला उत्सव यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. सर्व स्पर्धकांना व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेचे सूत्र संचालन विषय शिक्षक मुकेश रहांगडाले यांनी तर आभार शिक्षक मिलिंद रंगारी व संदीप सोमवंशी यांनी मानले. स्पर्धेच्या परीक्षकाचे कार्य शिक्षक राधेश्याम चौधरी, मिलिंद रंगारी, अध्यापकाचार्य श्रीमती मीनाक्षी कटरे, श्रीमती विद्या येटरे, श्रीमती वैशाली बघेले, दिलीप पडोळे यांनी केले.तर स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे, कु. शालिनी रहांगडाले, कु. शारदा जिभकाटे, कु. अंकला माने, विशेषतज्ञ प्रदीप वालदे, पी. पी. कॉलेज चे अध्यापकाचार्य डॉ. विनोद गेडाम, श्री खंगार, कमलेश डहाके यांनी पूर्णवेळ सहकार्य केले.