देवरी येथे 27 सप्टेंबरला भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोहळा
देवरी, दि. 23 देवरी तालुका नक्षलग्रस्त, आदिवासी सांस्कृतिक, विविधतेने नटलेला तालुका म्हणून जिल्ह्यासह राज्यात प्रसिद्ध आहे. तालुक्यातील जन समुदायाला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केले आहे. यांसह शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची गुणवत्तापूर्ण वाढ व्हावी म्हणून युवा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि शुक्रवार दि. 27 सप्टेंबर ला भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या भव्य कार्यक्रमाला जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांसह तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.युवा मराठी पत्रकार संघ संयुक्त वनामी फाऊंडेशन व हेल्पीग गृप यांच्या संयुक्त विद्यमाने देवरी तालुक्यात भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोहळा देवरी शहराच्या आमगाव रोडवरील सिताराम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. ह्या भव्य कार्यक्रमाला जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांसह तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रजित नायर (IAS) जिल्हाधिकारी गोंदिया, गोरख भामरे (IPS) पोलीस अधीक्षक गोंदिया, मुरुगानंथम एम (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया, नित्यानंद झा (IPS) अप्पर पोलीस अधीक्षक देवरी, राजवर्धन करपे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया, श्रीमती कविता गायकवाड उपविभागीय अधिकारी देवरी, उमेश काशिद प्रकल्प अधिकारी देवरी, विवेक पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रविण डांगे पोलीस निरीक्षक देवरी, शुभम जाधव गटविकास अधिकारी देवरी, इंद्रायणी गोमासे अप्पर तहसीलदार, करिश्मा वैधे मुख्याधिकारी देवरी, सचिन धात्रक वनपरिक्षेत्राधिकरी देवरी, प्रियांक सावंत भुमी अभिलेख अधिक्षक, तुषार काळेल ठाणेदार चिचगड, तुषार लबांळे निरिक्षक रा. उ. शुल्क देवरी, डॉ. लिलित कुकडे तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. गगन गुप्ता वैद्यकीय अधिक्षक, प्रशांत उईके, उप कार्यकारी अभियंता देवरी, लालन राजपूत कृषी अधिकारी देवरी, राहुल दुबाले अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना, ॲडव्होकेट सचिन बावरीया कायदेविषयक सल्लागार, प्रितमपालसिंग भाटिया मार्गदर्शक, मिथुन बंग मागदर्शन यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मार्गदर्शन सोहळा पार पडणार आहे.तालुक्यासह जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्याी – विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन युवा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले.