मनोहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन व बालिका सुरक्षा दिन साजरा

Deori ◼️मनोहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती” शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव माननीय श्री.रामकुमारजी गजभिये, प्रमुख उपस्थितीत प्राचार्य श्री. जी.एम. मेश्राम, उपमुख्याध्यापक श्री. एस.टी.हलमारे, पर्यवेक्षक श्री.डी.एच. ढवळे, प्राध्यापिका एस. व्ही. भुरे, श्री.आर. पी.मोहुर्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.सर्वप्रथम अध्यक्षांसह मान्यवरांनी डॉ. राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर गीतांनी सर्वांचे मन प्रफुल्लित केले.एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. राधाकृष्णन अशा आशयाचे भाषण सर्व मान्यवरांनी केले.अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते सलोख्याचे असावे,असे विचार व्यक्त केले. अशा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल नागदेवे यांनी केले तर आभार संजय अंबुले यांनी मानले.व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो प्रमुख जगदीश खेडकर,टी.आर.देशमुख, एम.पी.शेंदरे व सर्व स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Print Friendly, PDF & Email
Share