विद्यार्जन करून गेली आणि डॉक्टर बनून परतली, ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे अनोखा शिक्षक दिन साजरा

देवरी 05:- स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे अनोखा ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ब्लॉसम स्कूलच्या पहिल्या बैचची विद्यार्थिनी डॉ. यशा निनावे शिक्षक दिनानिमित्त शाळेला भेट येऊन शिक्षकांचा आशीर्वाद घेतला. यावेळी शिक्षण दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे, शिक्षिका वैशाली मोहुरले, सरिता थोटे,नामदेव अंबादे , नितेश लाडे , डॉ. यशा निनावे यांच्यासह शाळातील शिक्षक मंचावर उपस्थित होते.

आपण शिकवलेले विद्यार्थी डॉक्टर होऊन शाळेत परतले म्हणजेच शिक्षक दिनी मिळालेली ही खरी गुरुदक्षिणा आहे. यावे ज्ञानासाठी आणि निघावे सेवेसाठी ही उक्ती खर्या अर्थाने सार्थ ठरली आहे यावेळी प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी व्यक्त केले.

शिक्षक दिनानिमित्ताने शाळेतील इयत्ता ८ वी ते १० वी चे विद्यार्थी शिक्षकाच्या भूमिकेत आणि परिधानात उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना स्वयंशासन प्रणाली द्वारे शाळा व्यवस्थापन सांभाळले. प्रमुख अतिथी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली तसेच जीवनातील शिक्षणाचे महत्त्व आणि योगदान याविषयी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा गीत व भाषणाद्वारे शिक्षकांचा कार्यांच्या गूणगौरव केला. सदर कार्यक्रमात शिक्षकाची उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी निकिता बोहने आणि आभार प्रदर्शन साध्य थोटे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share