देवरी बसस्थानकात प्रवाशांच्या ‘सुरक्षे’ चे तीनतेरा, कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची मागणी
◼️सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांची उडवा उडवीची उत्तरे
देवरी ◼️ प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या देवरी बसस्थानकात आगमन होणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असून अनेकांना जीव टांगणीत ठेवून प्रवास करावा लागत आहे. येथे उपलब्ध करून देण्यात आलेली तोकडी सुरक्षा प्रवाशांच्या सुरक्षीततेची उणीव दिसून येत आहे. विभागाकडून बसस्थानकाच्या सुरक्षाविषयी आढावा घेण्यात आला नसून तालुक्याचे महामार्गावरील महत्वाचे स्थान असलेल्या देवरी बसस्थानक शेजारील छत्तीसगड, मध्यप्रदेश व गडचिरोली या जिल्हाना जोडणारा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. देवरी बसस्थानकातून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. इतर राज्यातून ये- जा करणाऱ्यांना देवरी शहरातुनच जावे लागत असल्याने दररोज २ ते ३ हजार प्रवाशी विविध ठिकाणी प्रवास करतात. देवरी स्थानक सण उत्सवात स्थानक परिसर प्रवाशांनी खचाखच भरलेला असतो. प्रवाशांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल परिवहन महामंडळाला होते. मात्र देवरी बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची सुरक्षेतेची जबाबदारी बस स्थानक प्रशासनाची असतांना देवरी बसस्थानकात मात्र सुरक्षेचा अभाव दिसून येतो. सुरक्षतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असणारे सीसीटीव्ही स्थानक परिसरात कार्यरत नसल्याने या ठिकाणची सुरक्षा राम भरोसेच आहे का? असाही प्रश्न निर्माण होत आहे.
चालक आणि वाहकाच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह : देवरी बस स्थानकावर ४-५ बसेस रात्र मुक्कामी असतात यावेळी वाहकांजवळ तिकीट ची जमा झालेली रक्कम सुद्धा असते. त्यामुळे महामार्गावरील या बस स्थानकावर मोठी घटना घडल्यावर जाग येणार का ? या वरून परिवहन विभागाचे कर्मचाऱ्यांची आणि रक्कमेची सुरक्षा देखील वाऱ्यावर आहे.
CCTV ची मागणी: सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी CCTV ची मागणी प्रवाशी लोकांनी केलेली आहे.
स्वच्छता गृहांचे बेहाल : ३ वर्षाआधी कोट्यवधीच्या निधी खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेल्या देवरी बस स्थानकाच्या स्वच्छतागृहाचे बेहाल झाले असून खिडक्या, स्वच्छता गृहाचे दार तुटलेल्या स्थितीत असल्यामुळे महिला, शालेय विद्यार्थिनी यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे महिला सुरक्षेचे प्रश्न देखील येरनीवर असल्याचे चित्र आहे.बसस्थानक प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणामुळे सामान्य प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. बसस्थानकातून अनेकवेळा पाकिटमारी झाली असून लाखोंचा ऐवज लुटला गेला आहे.
बस स्थानक बनले दारूचा अड्डा : रात्री बेरात्री प्रवाशी या ठिकाणाहून प्रवास करतात परंतु सुरक्षेच्या अभावी दारू पार्टी ची गंभीर समस्या बस स्थानकात हाल हुजर पणे सुरू असल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षितेचे तीनतेरा नेहमीच वाजलेले असतात. देवरी बसस्थानक प्रशासनाच्या कारभारामुळे प्रवाशांना नाहक अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. बसस्थानकात पुरुष प्रवाशांबरोबर अनेक महिला प्रवाशीही याठिकाणाहून प्रवास करतात. देवरी बसस्थानकाला अनेक समस्यांनी घेरले असून बसस्थानकाची सुरक्षतेची जबाबदारी स्थानिक प्रशासन घेत नसून प्रवाशांना सुरक्षितेचे कोणतेही ठोस उपाय प्रशासनाकडुन होतांना दिसत नाही. बसस्थानकात सीसीटीव्ही असणे आवश्यक असतांना पोलिसांची संख्याही वाढविणे आवश्यक आहे.
काय म्हणाले विभाग नियंत्रक भंडारा: ४ वर्षा आधी सुरक्षा रक्षकाची मागणी देवरी बस स्थानकात करण्यात आली होती परंतु त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. बस स्थानकात घडलेल्या प्रकाराची चौकशी करून तसा अहवाल पाठविण्यात येणार.
सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांशी यासबंधी चर्चा केली असता स्वच्छतागृह , cctv, प्रवाशी सुरक्षा सबंधी उडवाउडवीची उत्तरे देत अभियंत्यांवर जबाबदारी ढकलली.