अवैधरित्या झाडे कापणार्‍यांना ठोकल्या बेड्या

सडक अर्जुनी: येथील वनपरिक्षेत्रांतर्गत शेंडा सहवनक्षेत्रातील सहाकेपार बीटमधील नराटीटोला (पुतळी) नवातील परवानगी संरक्षित व राखिव वनातुन सागवन प्रजातीचे झाडे कापून विक‘ी करणार्‍या आरोपींना वन विभागाने ताब्यात घेत वन गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई आज 16 ऑगस्ट रोजी करण्यात आली.

वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रकाश धनलाल खंडाते व इतर तिघांना वनातील लाकूड चोरी प्रकरणी ताब्यात घेत त्यांची विचारणी केली असता पाच जणांनी 13 ऑगस्टच्या रात्री राखव वनातील सागवन प्रजातीचे एक व14 ऑगस्ट रोजी रात्री एक झाड अशी दोन झाडे कापुन व त्यांचे 9 नग तयार करून पळसगांव/सोनका ता. साकोली जि. भंडारा येथील शंकर ब‘ाम्हणकर यांना 25 हजार रुपयात विक‘ी केल्याचे कबूली दिली. विक‘ी केलेल्या सागवनाची शासकीय किमत 1 लाख 6 हजार 963 रुपये (2.087 घन मीटर) सांगीतली जाते. सागवन लाकूड वाहतुक करणारा वाहन क‘मांक एमएच 35 जे 3296 व लाकडे जप्त करून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलमान्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्या 17 ऑगस्ट रोजी आरोपीांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, जांभळीचे क्षेत्रसहायक यु. पी. गोटाफोडे, रेंगेपारचे क्षेत्रसहायक एस. ए. घुगे, वनरक्षक डी. डी. माहुरे, टी. पी. चव्हाण, पी. व्ही. कांबळे, टी. एम. बेलकर, पी. एम. पटले, आर. जे. उईके, एम. एफ. सैय्यद, महिला कर्मचारी टी. आर. भेलावे, पी. व्ही. कान्हेकर, मेंढे, भरत बहेकार, समिर बंसोड, विपुल शहारे, किशोर बडवाईक यांनी केली.

Share