अग्रवाल कंपनीने तयार केलेला राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी निवारा कोसळला

देवरी ◾️तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर देवरी-कोहमारा दरम्यान उड्डाणपूलाचे काम प्रगतीपथावर आहे. हे कामे कासव गतिने व दर्जाहिन होत असल्याचा आरोप होत आहे. पुलाजवळील सुरक्षा भिंत कोसळल्यानंतर आता उड्डाणपूलाजवळील प्रवासी निवाराही भूईसपाट झाल्याने बांधकामाचा गुणवत्तेवर नागरिकांनी प्रश्न निर्माण केले आहे.

महामार्गावरील सुरक्षित रहदारी व वन्यप्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उड्डाणपुलाचे बांधकाम पाच वर्षापुर्वी हाती घेण्यात आले. बांधकामाचे कंत्राट अग्रवाल कस्ट्रक्शन कंपनीला आहे. उड्डाणपूल व रस्त्याचे बांधकाम सुमार दर्जाचे होत आहे. शिवाय अनियमित बांधकाम आणि महामार्ग प्राधिकरणाच्या नियमांना तिलांजली दिली जात आहे. निर्माणाधीन बांधकामामुळे क्षेत्र अपघात प्रवण ठिकाण बनले आहे. अपघात अनेकांना प्राणास मुकावे लागलग आहेतर कित्येकाना अपंगत्व आले आहे. कामाची मंद गती व दर्जाहिन कामामुळे परिसरातील नागरिकांनी तक्रारी, निवेदने, आंदोलने केली आहेत. कंत्राटार कंपनी, प्राधिकरणाचे अधिकारी तांत्रिक बाबी पुढे करून नहमीच आरोप फोटाळतात. पावसाने निकृष्ट बांधकामाची पोलखोल केली आहे. उड्डाणपुलाला लागून असलेल्या रस्त्याची सुरक्षा भिंत कोसळली. सुदैवाने यावेळी अप्रिय घटना घडली नसली तरी निकृष्ट बांधकामाचे वास्तव नाकारता येणार नाही. या प्रकाराबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान खा. प्रशांत पडोळे यांनी घटनास्थळी भेट देत कंपनीच्या अधिकार्‍यांना धारेवर घेतले. निकृष्ट बांधकाम थांबवा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला.

कुशल व अनुभवी ठेकेदार मिळाला नसल्याने मुरदोली अकुशल ठेकेदाराला निवार्‍याचे कंत्राट देण्यात आले. अतिवृष्टि व सततचा पावसामुळे कदाचित भुस्कलन होऊन निवारा कोसळला असावा, प्रकाराची दखल घेवू, ठेकेदाराची देयके थांबवू असे अग्रवाल कंपनीचे सुशिल त्रिपाठी यांनी सांगीतले.

Share