कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी समाज प्रबोधनात्मक कार्य
देवरी २६
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभाग अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्यावतीने अक्षय शिक्षण संस्था देवरी यांची निवड करण्यात आली असून शासनाच्या विविध योजनांची माहिती लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून व कोविड १९ विषयावर समाजप्रबोधन करण्यात आले आहे.
देवरी तालुक्यातील वडेगांव येथे अक्षय शिक्षण संस्था देवरी च्या कलापथकाच्या माध्यमातून प्राध्यापक रामटेके सर कोरोना महामारी विरुद्ध जनजागृती करित सर्वांना घरीच रहा सुरक्षित रहा असे आवाहन करीत आहेत. विविध विषयावर समाजप्रबोधन करुन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले आहे. विविध नाटके, गाणी लिहून समाज प्रबोधन करीत आहेत. हुंडाबळी, दारूबंदी अशा अनेक समाज प्रबोधनात्मक नाटका व शासकीय उपक्रमात मागील अनेक वर्षापासून सहभाग घेत ते समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत.
कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव करण्यासाठी समाज प्रबोधन करीत आहेत. अक्षय शिक्षण संस्था देवरीच्या कलापथकाच्या माध्यमातून जवळपास सर्वच ठिकाणी जनजागृती करित आहेत. प्रत्येक जण शासनाला एक ना अनेक प्रकारे मदत करीत असून त्यात अक्षय शिक्षण संस्था देवरी हि मागे नाही. आपत्कालीन काळात शासनाची भूमिका समाजासमोर आपल्या कलापथकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन सर्वसामान्य पर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत. अक्षय शिक्षण संस्था कडून प्राध्यापक रामटेके सर मनोहर भाई पटेल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवरी यांच्यासह निखिल बन्सोड भारतीय विद्यार्थी संघटना जिल्हा अध्यक्ष, हर्षद खोब्रागडे, उमेश कडाबोईर, यामिनी देशमुख, शितल पटले, नेहा गाते, खुशाली झिंगरे, प्राध्यापक नागदेवे सर, नाल वादक – येळमे सर देवरी, हार्मोनियम आणि ब्राँझ्यो वादक- उमेश कांबळे सर्वांनी सोशल डिस्टन चे पालन करून आपल्या कलागुणांच्या माध्यमातून कोरोना विषयी सतत जनजागृती करीत आहेत.
शासनाच्या विविध योजना, मा कसम, कोविड १९ विषाणूपासून बचाव करण्यासाठी लोककला व पटनाट्याच्या माध्यमातून ग्रामस्थांचे मनोरंजन करुन प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून छत्रपाल राऊत माजी सरपंच ग्रामपंचायत कार्यालय वडेगांव तसेच प्रमुख अतिथी म्हणून रमेश जी बागडे पोलीस पाटील, अनिल जी बिसेन सामाजिक कार्यकर्ते, मनोहर जी राऊत माजी सरपंच, बावने सर ग्रामसेवक, भोजराज चाकाटे सर, संजय अंबुले सर, पटले सर, कुवरलाल फुंडे, धनराज राऊत, वारलुजी भोयर, विद्यार्थी, विद्यार्थीनी व समस्त ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.