माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे पुरस्कारांची घोषणा
शिक्षण विभागाने वैयक्तीक स्तरावरील पुरस्कार पात्र यादी निवड केली
★ डॉ. सुजित टेटे । संपादक
गोंदिया 25 : महाराष्ट्र शासनाने कोरोना महामारी विरुद्ध लढा उभारताना माझे कुटुंब – माझी जबाबदारी ही मोहिम दि. 15 सप्टेबर 2020 ते 25 ऑक्टोबर 2020 दरम्यान लोकसहभागाच्या दृष्टीने विविध बक्षीस योजना या व्यक्ती आणि संस्थासाठी चे आयोजन केलेले होते.
त्याच अनुषंगाने व्यक्ती साठीच्या योजनामध्ये निबंध स्पर्धा, पोष्टर स्पर्धा, आरोग शिक्षण मेसेज स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इ. घेण्यात येणार होते तसेच संस्थासाठी वेगवेगळया संस्थाच्या कामकाजानुसार बक्षिस योजना घेणे होते.
सदर स्पर्धा हे जिल्हास्तर व आमदार मतदार संघ अशा दोन विभागात विभागले जाण्याचे आदेशित होते. त्या अनुषंगाने शिक्षण विभाग, जिल्हा परिषद गोंदियाने वैयक्तीक स्तरावरील पुरस्कार पात्र यादी निवड केली आहे.
जिल्हा स्तरावरील पुरस्कार पात्र व्यक्ती मध्ये 1) विशाल रामकिशन कटरे, मनोहर म्यु.हायस्कुल गोदीया, 2) कु.गायत्री सहारे, फुंडे सायन्स कॉलेज, फुलचुर, 3) सलोनी संतोष नागफासे, जि.प. प्राथ.शाळा बिरसोला, 4) सागर देवेंद्र भजने, पं. बापु देशमुख विद्या. एरंडी महागाव, 5) रजत भास्कर मानापुरे, जि.प.हायस्कुल नवेगाव बांध, 6) श्री राजेंद्र धर्मदास बंसोड, जि.प. उच्च प्राथ शाळा निम्बा, ता. गोरेगाव, 7) कु. वैभवि संजय भगतकर, छत्रपती शिवाजी हायस्कुल देवरी, 8) कु. स्वेजल मेळे, विद्या निकेतन हायस्कूल, आमगाव, 9)कु. मोहिनी मदनलाल ढेकवार, छत्रपती विद्यालय सितेपार, आमगाव , 10) अथर्व पांडुरंग तिडके, जि.प. शाळा येडमाकोट ता. तिरोडा, 11) श्रीयांशी मिश्रा, के.पी. असाटी शाळा पालंडोंगरी ता. तिरोडा, 12) कु.हर्षा नामदेव नेवारे, लो. तिलक विद्यालय मुंडीपार, ता. गोरेगाव यांचा समावेश आहे.