युवापिढीला जोडणारा दुवा , रोल मॉडेल ‘हेल्पिंग बॉईज ग्रुप’

🔺स्वातंत्रदिनी 131 रक्तदात्यांनी केले रक्तदान

देवरी ◼️ (प्रा. डॉ. सुजित टेटे) सुसज्ज असावेत गांवचे तरुण । कोणतेंहि संकट येतां ऐकून । आपुलीं सर्व कामें सोडून । धांव घ्यावी तयांनी ॥ग्रामगीता संत गाडगे महाराजांच्या ओळींना सार्थ ठरेल असेल मार्मिक कार्य करणाऱ्या हेल्पिंग बॉईज ग्रुपचे अलौकिक सामाजिक कार्याला ‘प्रहार टाईम्स’ चा सलाम. सोशल मीडियाचा वापर करून आदर्श ग्रुप कसा तयार करता येणार याचे जागते उदाहरण म्हणजे हेल्पिंग बॉईज ग्रुप त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे समाजात एक रोल मॉडल म्हणून नवीन ओळख निर्माण केली आहे. शहरातील स्वच्छता ते गरजूंना मदत, रस्त्यातील ट्रॅफिक पासून अपघातातील जखमींना आधार देणारे कौतुकास्पद कार्य करणाऱ्या हेल्पिंग बॉईज ग्रुपने स्वातंत्र्य दिनानिमीत्त देवरी शहरात रक्तदान शिबीर आयोजित केले होते. समाजातील प्रत्येक स्तराच्या लोकांना जोडून रक्तदान महादान उपक्रमाचे आयोजन थाटात पार पडले यामधे १३१ लोकांनी रक्तदान करून आपुलकीने आत्मीयता जपली.याच संकल्पनेतून मदतीचा हात आणि सामाजिक संदेश देण्यासाठी हेल्पींग गृप तर्फे स्वातंत्र्य दिना निमीत्त शहरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

देवरी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी उमेश काशीद , उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, पोलीस निरीक्षक प्रविण डांगे, वैदकीय अधिकारी डॉ. ललित कुकडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गगन गुप्ता यांच्या प्रमूख उपस्थितीत या शिबीराचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमगाव देवरी विधानसा क्षेत्राचे आमदार कोरोटे , माजी आमदार संजय पुराम, गोंदिया महिला बालकल्यान सभापती सविताताई पुराम , सामाजिक संस्था, राजकीय कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, युवा वर्ग मोठ्यासंख्येने हजेरी लावून गेले हे विशेष.

Share