बेरोजगार युवकांना देवरी पोलिसांचा आधार, २० बेरोजगारांना मिळाला रोजगार

देवरी ◼️ कांही सण घरीं करावे । कांही सार्वजनिक जागीं ठरवावे । सर्व मिळोनि उचलीत जावे । ओझे कांही ग्रामगीतेतील ओळींना सार्थ ठरेल असे कार्य देवरी पोलिसांनी करून दाखविले आहे. २० बेरोजगारांना सुरक्षा जवान व सुरक्षा सुपरवायजर म्हणून नियुक्ती आदेश देवून समाजहितार्थ कार्य केले आहे. जिल्हाचे पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांचे संकल्पेनेतुन, नित्यानंद झा अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात व प्रविण डांगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवरी यांचे उपस्थितीत गोंदिया जिल्हयातील नक्षलग्रस्त भागातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता दिनांक १७/०८/२०२४ रोजी पोलीस स्टेशन देवरी येथे कमान्डेंट कार्यालय क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र, खसरा, नरसाल हुडकेश्वर नागपुर यांचे तर्फे सुरक्षा जवान व सुरक्षा सुपरवायजर या पदांकरीता (सेक्युरिटी गार्ड) १० वी १२ वी पास युवकांसाठी विशेष भरती अभियान राबविण्यात आला.

सदर भरती प्रकीयेमध्ये ३५० युवकांनी भाग घेतला त्यापैकी २० युवक हे शारीरीक चाचणीत पात्र ठरले असुन त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली असता त्यामध्ये २० युवकांची निवड करण्यात आली. सदर निवड झालेल्या युवकांना प्रशिक्षणाकरीता आदेशीत करण्यात येइल असे कळविले.सदर भरती प्रकिया यशस्वी व्हावी व नक्षल भागातील जास्तीत-जास्त युवकांना भरती प्रकियेचा लाभ घेवुन रोजगार मिळावा याकरीता पो. स्टे. देवरी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नक्षल सेल गोंदिया येथील अधिकारी व अंमलदार यांनी विशेष योगदान दिले आहे. तसेच मेळाव्याला आलेले सुशिक्षीत बेरोजगार युवकाना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Share