हरवलेले मोबाईल फोन पोलीस अधीक्षकांच्या हस्ते परत

देवरी ◾️गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, कैम्प देवरी, विवेक पाटील, उपविभागिय पोलीस अधिकारी देवरी, प्रविण डांगे पोलीस निरिक्षक देवरी यांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे व आदेशान्वये पोलीस ठाणे देवरी हद्दीतील हरविलेले मोबाईल शोच संबधाने CEIR प्रणालीचा वापर करुन ०९ मोबाईल- वनप्लस, विवो, सैमसंग, रियलमी, ओप्पो, स्पार्क कंपनीच्या मोबाईलचा शोध देवरी पोलीसाद्वारे घेण्यात आले होते.

स्वतंत्र दिनानिमित्त देवरी पोलीसांनी शोध घेतलेले ०९ मोबाईल गोरख भामरे यांचे हस्ते मोबाईल अर्जदारांना (मालकांना) परत करण्यात आले. अर्जदारांनी मोबाईल शोधुन मिळाल्याने गोंदिया पोलीस दल व देवरी पोलीसांचे आभार मानले आहे. सदर मोबाईल शोध कामगिरी पो.शि. गोपालप्रसाद पांडे, ब.न. १४५० यांनी केली.

Share