पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल देवरी येथे झेंडावंदन व वृक्षारोपण कार्यक्रम

देवरी ◾️वृक्षारोपण व ध्वजारोहण कार्यक्रमाला अध्यक्ष राजेश चांदेवार ,उपाध्यक्षअर्चना ताराम, सदस्य एडवोकेट सचिन बावरिया, वनिता राजकुमार कुथीर ,शशिकला चांदेवार ,सुनीता सुभाष मेश्राम, सीमा साखरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . कार्यक्रमाचे संचालन डिलेस टेटे उप मुख्याध्यापक यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक कापसे मुख्याध्यापक यांनी केले आपल्या प्रास्ताविकेमध्ये शाळेला सुंदर बाग निर्माण करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांची वाढदिवस आहेत सार्थक बावरिया, मयंक राऊत त्यांनी शाळेचे सौंदर्य वाढविण्याकरिता सुंदर झाडे दिले. तसेच लायनेस क्लब तर्फे शाळेला वृक्षारोपण करण्यात आले .कॅनरा बँकेतर्फे पाच ते दहा मध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले .शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ अर्चनाताई ताराम ,अमनउल्ला खान सदस्य तसेच विलासजी भैसारे यांनी बँड दुरुस्तीसाठी शाळेला अनुदान दिले त्यांचे खूप खूप आभार मानले. भविष्यात अशाच प्रकारची पालकांकडून मदत उपलब्ध होईल व शाळेच्या विकास घडवून येईल अशी आशा बाळगून वरील सर्व दानदात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी लांजेवार सर ,कमलाकर कुरधने सर,आशिष खंडारे सर ,पराग कराडे सर ,श्री कुथीर सर ,फुन्ने मॅडम, ठवरे मॅडम, गावडकर मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे आभार श्री. टी. ए. पिलारे सर यांनी केले.

Share