मनोहरभाई पटेल हायस्कूल संलग्न विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे “हर घर तिरंगा” मोहिमे अंतर्गत ध्वजारोहण

देवरी ◾️येथील मनोहरभाई पटेल हायस्कूल संलग्न विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात श्रीमाननीय यादोरावजी पंचमवार (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती देवरी)यांच्या अध्यक्षतेखाली माननीय उपमुख्याध्यापक श्री.एस.टी.हलमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मंचावर माननीय मुख्याध्यापक श्री जी.एम.मेश्राम, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.व्ही.एस.गेडाम, पर्यवेक्षक श्री डी.एच.ढवळे,शाळा उपप्रमुख आर. एन. कारेमोरे तसेच वरिष्ठ शिक्षक श्री.ए.आर.गेडाम सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी माननीय श्री.यादोरावजी पंचमवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून तिरंगा राष्ट्राचा मान, सन्मान व स्वाभिमान आहे,त्याचे पावित्र्य जपणे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे.असे विचार व्यक्त केले व सर्वांना स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अशा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय.डब्ल्यू. फेंडर यांनी केले तर आभार श्री.व्ही.जी. नागदेवे यांनी मानले.सोबतच संगीत साथ देणारे संजय निखारे व कार्तिक बावनकर यांच्या संगीतमय कृतीने कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी स्वरसाथ देवून कार्यक्रम रंगतदार बनविला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,रासेयो प्रमुख जे.जी.खेडकर व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम केले .

Share