तुम्ही आयकर भरत असाल तर आता बंद होईल रेशन!

गोंदिया : समाजातील गरीब व सर्वसामान्य नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार मोफत सवलतीच्या दरामध्ये धान्य पुरवठा करण्यात येतो. यामध्ये प्राधान्य कुटुंब गट व अंत्योदय रेशन कार्डधारकांना हा लाभ दिला जातो. नियमाप्रमाणे १०० चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन, प्लॉट, फ्लॅट आणि घर असणारे नागरिक, चारचाकी वाहन कार ट्रॅक्टर असणारे नागरिक, इन्कम टॅक्स भरणारे

नागरिक, शस्त्र परवाना असलेले नागरिक, घरात फ्रीज आणि एसी असणारे नागरिक आणि सरकारी नोकरीत असलेले नागरिक अशांना रेशन धान्याचा लाभ मिळत नाही. तरीही जिल्ह्यात हजारो रेशन कार्डधारक छुप्या मार्गाने धान्य मिळवत आहेत. त्यामुळे गरिबांच्या अन्नावर हा डल्ला समजला जातो. रेशन घेण्यासाठी पात्र १,६३५ जणांचे रेशन बंद केले आहे. जिल्ह्यात एक लाख ६९ हजार ९३१ प्राधान्य कुटुंबीय लाभार्थी असून ८१ हजार ९७२ अंत्योदय लाभार्थी आहेत

Share