
अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सखोल चौकशी करण्यात येईल: खा.डॉ.प्रशांत पडोळे
Deori अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सखोल चौकशी करण्यात येईल. शशिकरण घाटावर झाले जनआंदोलन. कोहमारा ते रायपूर रोडवर असलेल्या नॅशनल हायवे ओव्हर ब्रिजला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, सबंधित अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी द्वारा तयार होत असलेल्या ब्रीजचे काम निकृष्ट दर्जाचे दिसून आले. अधिकारी यांना भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी चांगलेच खडे बोल सुनावले. सदर ब्रिजला मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. निकृष्ट दर्जाचे सदर ब्रीज चे काम कोहमारा पासून ते देवरीचे पर्यंतचे होत आहे, सदर कामाची अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अधिकारी सह पाहणी केली. पंधरा-पंधरा दिवसांनी दोन्ही ब्रिजवर अपघात झालेला आहे. तर एक ब्रीज मध्यभागापासून कोसळलेला दिसून आला. याची सखोल चौकशी करण्यात येईल. असेही यावेळी खासदार पडोळे यांनी सांगितले. लवकरात लवकर नॅशनल हायवे ब्रीजच्या कामाची सुधारणा केली गेली नाही तर याच ठिकाणी मोठ्या संख्येने जनआंदोलन करण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अधिकाऱ्यांची राहील.
देवरी सशिकरन घाट , डूग्गीपार पार नैनपुर, देवरी मसवाणी घाट, होत असलेल्या नॅशनल हायवे ओव्हर ब्रिजच्या कामात दुरुस्ती करा, दर पंधरा दिवसांनी दोन्ही वर ब्रिजवर अपघात झालेले आहेत. एकीकडे भाजपा सरकार विकासाची चर्चा करते आणि दुसरीकडे एवढे मोठे भगदाड पाडून ठेवते, जनतेच्या जीवाशी खेळू नका, उर्वरित काम निकृष्ट दर्जाचे न करता मजबूत तयार करा. असेही यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. डॉ.प्रशांत पडोळे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.