१७ ऑगस्ट ला पोलीस स्टेशन देवरी येथे रोजगार मेळावा

देवरी ◾️गोंदिया जिल्हयातील नक्षलग्रस्त पोलीस ठाणे अंतर्गत बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे दृष्टीने भारतीय सुरक्षा दक्षता परिषद नई दिल्ली यांचे मार्फत एस.आय.एस. (इंडिया) लि. व पोलीस विभाग यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत सुरक्षा गार्ड करीता उमेदवारांची नोंदणी करुन प्रशिक्षण देणे व ते पुर्ण केल्यानंतर विविध कंपन्यांमध्ये सुरक्षा गार्ड म्हणून रोजगार देण्याकरीता जिल्हयातील देवरी पोलीस स्टेशन स्तरावर दिनांक १७/०८/२०२४ रोजी पोलीस स्टेशन देवरी येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांचे शारीरीक मोजमाप व वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असुन त्यामध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना कमाण्डेंट, क्षेत्रीय प्रशिक्षण अकॅडमी नागपुर (म.रा.) येथे एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एस. आय.एस. ग्रुप सह संलग्नीत असलेल्या कंपन्यांमार्फत संपुर्ण भारत देशातील विविध शासकीय, अर्धशासकीय, खाजगी, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपनीचे औद्योगिक केंद्र, खाणी, शैक्षणिक केंद्र, होटल, हॉस्पीटल्स, मॉल, टॉल ब्रिज, मेट्रो तसेच एअरपोर्ट इत्यादी ठिकाणी सुरक्षा गार्ड/सुपरवायझर म्हणुन नेमणुक केली जाणार आहे. सदर कंपनीमध्ये कार्यरत सर्व कर्मचारी यांना ६५ वर्षापर्यंत नोकरी, इ.पी.एफ., ई.एस.आई., ग्रेच्युटी, बोनस, फॅमीली पेंशन, अपघात विमा व इतर सुविधा प्रदान करण्यात येणार आहे.

करिता पोलीस स्टेशन देवरी हद्दीतील बेरोजगार युवकांना दिनांक १७/०८/२०२४ रोजी सकाळी १०/०० वा. ते १६/०० वाजता पर्यंत पोलीस स्टेशन देवरी अंतर्गत येत असलेल्या ऑफताब मंगल कार्यालय देवरी येथे सदर रोजगार मेळाव्याचालाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे.

Share