ब्लॉसम स्कूल येथे दंत तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन

देवरी ◾️ तालुक्यातील अग्रगण्य ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर दंत तपासणी आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देवरीच्या बाल आरोग्य चिकित्सक डॉ. डिंपल तिराले (एमडीएस) यांच्या सह त्यांची टीम ३ दिवसीय शिबिरामध्ये सहभागी होऊन शाळेतील विद्यार्थींची आरोग्य तपासणी केली.

सदर शिबिराच्या उद्घाटनीय सोहळ्यात शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे, बाल आरोग्य चिकित्सक डॉ. डिंपल तिराले, शिक्षक भोजराज तुरकर, वैशाली मोहुरले, सरिता थोटे, आकांशा डिबे आदी उपस्थित होते. सन्मान चिन्ह , भेटकार्ड देऊन प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी सर्वांच स्वागत केला. सदर शिबिरात एकूण ४५८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून आरोग्य कार्ड चे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला मृतरूप देण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केला.

Share