मनोहरभाई पटेल प्राथमिक, हायस्कूल, संलग्न विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे ध्वजारोहण व वृक्षारोपण

Deori ◾️मनोहरभाई पटेल प्राथमिक, हायस्कूल, व कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत, ध्वजारोहण व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष के.सी.शहारे(माजी प्राचार्य एम.बी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय देवरी), विशेष अतिथी म्हणून प्रविण डांगे (पोलिस निरीक्षक देवरी), प्रमुख उपस्थितीत सचिन धात्रक (वनपरिक्षेत्राधिकारी देवरी), बी.एन.चिडे(वनपरिक्षेत्राधिकारी देवरी) तसेच मुख्याध्यापक जी.एम.मेश्राम, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एस.गेडाम, उपमुख्याध्यापक एस.टी.हलमारे, पर्यवेक्षक .डी.एच. ढवळे, शाळा उपप्रमुख.आर. एन.कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष के.सी.शहारे यांनी वृक्ष व त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे, अशा शब्दांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच माननीय सचिन धात्रक सरांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे”या तुकोबांच्या काव्याची आठवण करून देतानाच वृक्षांचे जतन करणे आवश्यक आहे.अशा आशयाचे भाषण केले व प्रत्येकांनी झाडांची लागवड करावी.असा मौलिक संदेश विद्यार्थ्यांना दिला. माननीय श्री.प्रविण डांगे यांनी सुद्धा मानवी जीवनात वृक्ष किती महत्वाचे आहेत, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अशा बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.पी.देशमुख यांनी केले तर आभार श्री. वाय.डब्ल्यू.फेंडर यांनी मानले.व या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व रासेयो प्रमुखासह सर्व स्वयंसेवकांनी उत्तम सहकार्य केले.

Share