“राष्ट्रीय सेवा योजना” अंतर्गत “विश्व आदिवासी दिनाचा” व ऑगस्ट क्रांती दिन साजरा

देवरी ◾️मनोहरभाई पटेल हायस्कूल संलग्न विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे “राष्ट्रीय सेवा योजना” अंतर्गत “विश्व आदिवासी दिनाचा” व ऑगस्ट क्रांती दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक माननीय श्री.जी.एम.मेश्राम, प्रमुख उपस्थितीत उपमुख्याध्यापक श्री.एस. टी. हलमारे, पर्यवेक्षक श्री.डी.एच. ढवळे तसेच श्री. एस.पी.देशमुख, श्री.बी. एस. चाकाटे ,कु. व्ही.व्ही. परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा या क्रांतिकारकाच्या तैलचित्राचे पूजन करून करण्यात आली.यावेळी प्रमुख उपस्थितीतील समस्त मान्यवरांनी मुलनिवासी आदिवासी समाज व संस्कृती,रिती, परंपरा व विकास या विषयावर प्रकाश टाकला. तसेच माननीय मुख्याध्यापक श्री जी. एम. मेश्राम सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण करणाऱ्या बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाचे रक्षण करण्यासाठी आपले तारुण्य पणाला लावले, व समाजाचे रक्षण केले,असे विचार मांडले.
अशा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख जे.जी.खेडकर यांनी केले तर आभार अश्विनी झंजाळ मॅडम यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,रासेयो स्वयंसेवक, विद्यार्थ्यी , विद्यार्थिनी यांनी अथक परिश्रम परिश्रम केले.

Print Friendly, PDF & Email
Share