देवरी: राष्ट्रीय महामार्गावरील निर्माणाधीन उड्डाण पुलाची भिंत कोसळली

देवरी ◾️राष्ट्रीय महामार्ग 53 वरील नवनिर्माणाधीन उड्डाण पुल सुरु होण्याआधी पुलाची भिंत कोसळली अग्रवाल गोलबल कंपनीच्या कामावर प्रशन चिन्ह निर्माण झाला आहे. गोंदिया जिल्हातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर अग्रवाल ग्लोबल कंपनी कडून उड्डाण पुलाचे आणि महामार्गाचे काम सूरु आहे मात्र महामार्गात आणि उड्डाण पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य व मधून राखडीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने पाऊसाची दमदार हजेरी लागताच या उड्डाण पुलावर पंधरा दिवसा आधी शसीकरण जवळील घाटातील पुलावर मोठा खड्डा पडला होता तर काल रात्री दमदार पाऊसाने जिल्यात हजेरी लावल्याने नवनिर्वाचित उडाण पुलाची भिंत खाली कोसडली मात्र सुदैवाने कुठलीही जिवंत हानी झाली नसली तरी उडाण पुला खालून जाणाऱ्या सर्व्हिस रोड वरील वाहण चालकाच्या बोनेट वर भिंतीचे गट्टू कोसडल्याने कार चालकाचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या पंधरा दिवसात आलेल्या दमदार पाऊसाने अग्रवाल कंपनीच्या बांधकामची पोल खोल केली आहे तर दुसरीकडे मासुलकसा घाटात बांधण्यात आलेला उडाण पूल सुरु होण्याआधीच उडाण पुलाची भिंत कोसडल्याने बांधकामावर प्रशन चिन्ह निर्माण झाला आहे. भारतीय राष्ट्रिय राज्य मार्ग प्राधिकरण यांनी अग्रवाल कंपनी ला 350 कोटी मध्ये काम दिल्याचे सांगितले जातं आहेः कंपनीतील काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हि भिंत कोसळल्याचे सांगितले जात आहे.

Print Friendly, PDF & Email
Share