संजय पुराम देवरी नगरपंचायतीच्या विकासाचे खरे ‘विकासपुरुष’

◾️पदावर असो की नसो लोकसेवा हेच माझे ध्येय : मा. आमदार संजय पुराम

देवरी ◾️नगरपंचायतीचे खरे विकासपुरुष म्हणून संजय पुराम यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या कार्याची परतफेड म्हणून शहरातील प्रत्येक कामाचे भूमिपूजन नगर पंचायतने त्यांच्या हातून करून घेतले. पदावर नसतांना सुद्धा संजय पुराम यांनी १२ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन देव नगरीच्या विकासासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. यानिमित्ताने गुणवंत्त विद्यार्थी सत्कार आणि घरकूल राशी वितरण कार्यक्रमाचे आयोजन आफताब मंगल कार्यालयात करण्यात आले होते.

मानव सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा आहे असे आमच्या राष्ट्रसंतानी सांगितलेला आहे. मी त्यांच्याच विचाराचा पाईक असून विद्यार्थी जीवनापासूनच लोकसेवेसाठी समर्पित आहे. कोणत्याही पदावर मी असो किंवा नसो माझ्या घरी नेहमीच जनता दरबार लागला असतो. सन 2014 ते 2019 पर्यंत आमगाव-देवरी-66 विधानसभेचा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. सन 2019 मध्ये निसटत्या मताने माझा पराजय झाला. तरी मी खचलो नाही, लोकसेवेसाठी समर्पित भावनेने कामाला लागलो, असे मनोगत माजी आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमात ढासगड सेवा समितीचे अमरज्योती तावाडे महाराज, मा.आ. संजय पुराम , सविता पुराम, अंबिका बंजार, अनिल बिसेन, संजू उइके, प्रवीण दहीकर, नगर पंचायतीचे सर्व सभापती आणि पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आजही संजय पुराम युवा आणि वृध्द वर्गात लोकप्रिय असून त्यांना हजारोच्या संख्येनी चाहत्यानी वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून आमगाव देवरी विधानसभेचे पुन्हा नेतृत्व करण्याचा आग्रह केल्याचे बघावयास मिळाले.

Print Friendly, PDF & Email
Share