देवरी येथे माझी लाडकी बहिन योजना समितीची सभा संपन्न
■ विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष रमेश ताराम यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन
देवरी ०८: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना आमगावं-देवरी विधानसभा क्षेत्र स्तरीय समिती ची सभा बुधवार(ता.०७ आगस्ट) रोजी येथील तहसील कार्यालयाच्या कक्षामध्ये विधानसभा क्षेत्राचे नवनियुक्त अध्यक्ष रमेश ताराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेत योजनेतील देवरी तालुक्यातील लाभार्थ्यांच्या पात्र,तातपुरते रिजेक्ट व फुल्ली रिजेक्ट अर्जावर चर्चा करून तातपुरते रिजेक्ट अर्जाची त्रुटी पूर्तता करण्याकरीता ग्रामस्तरावर पाठविण्या बाबद ठरवून या विषयावर समिती मार्फत मंजूरी देण्यात आली. देवरी तालुक्यात बुधवार (ता.०७ आगस्ट )पर्यत पोर्टल द्वारे प्राप्त एकूण लाभार्थी २६,८७० पैकी पात्र लाभार्थी २५९५८ एवढे असून तातपूरते रिजेक्टटेट ९०७ आहेत आणि फुल्ली रिजेक्टटेट ०५ लाभार्थी आहेत.
या सभेत विधानसभा क्षेत्राचे योजना समितीचे अध्यक्ष म्हणून रमेश ताराम,सदस्य सचिव तहसीलदार माधुरीताई टेकाडे, अशासकिय सदस्य प्रभाकर दोनोडे, सुमनताई बिसेन, सदस्य सहाय्यक प्रकल्प अधिकारी(ए.आ.वि.प्र.) डॉ. सायली चिखलीकर, बालविकास प्रकल्प अधिकारी संतोष वर्पे, संरक्षण अधिकारी ममता बारेवार,आंगणवाडी पर्यवेक्षीका कुंती नेताम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या सभेचे संचालन व उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार अनिल पवार यांनी मानले.