
मदतनिस भरती प्रक्रियेत कुठलेही आमिष आणि प्रलोभनाला बळी पडू नका- सविता पुराम
गोंदिया (प्रहार टाईम्स) जिल्हा परिषद गोंदिया येथील बाल विकास प्रकल्पा अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामिण क्षेत्रातील रिक्त असलेले मदतनिस पदाची भरती संबधात एकुण २४४ पदाकरिता दिनांक २५/६/२०२४ मंगळवार रोजी जाहिरात प्रकाशीत करण्यात आली होती व त्या संबधाने भरती प्रक्रिया सुरु आहे. सदर भरती प्रक्रिया ही महिला व बालविकास विभागातील शासन निर्णय क्रमांक (१) एबावि-२०२२/प्र.क्र.९४/का.६ दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ व (२) महिला व बालविकास विभागातील शासन निर्णय क्रमांक एबावि-२०२२/प्र.क्र.९४/का.६ दिनांक ११ ऑगस्ट २०२३ मध्ये नमुद केलेल्या अटी व शर्ती प्रमाणे भरती प्रक्रिया घेण्यात येईल. या भरती प्रक्रिये मध्ये पारदर्शीतेचे काटेकोर पणे पालन करण्यात येईल. सदर भरती प्रक्रियेत थेट नियुक्ती करण्यात येणार असुन कोणत्याही प्रकारची मुलाखत न घेता गुणानुक्रमा नुसार अंतीम निवड यादी लावण्यात येईल व पात्र उमेद्वाराची निवड करण्यात येईल.
सदर भरती प्रकियेत पारदर्शीकता राखली जाईल त्यामुळे भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या आमिष किंवा प्रलोभनास बळी पडु नये असे आवाहन सविता संजय पुराम, सभापती महिला व बालकल्याण समिती, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी केले आहे.